Monday, February 19, 2018
सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!
सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!
अजय आपल्या मित्रांना सांगत होता, अरे! परवा मुलाची पिगीबँक फोडली (म्हणजे पैसे साठवायचा डबा) तर त्यातून अठरा हजार रुपये निघाले. सात वर्षे त्यात आम्ही पैसे टाकत होतो. घेतानाच मोठी घेतली होती मला वाटले होते पाच-एक हजार निघतील. मोजले तर अठरा हजार आणि वर निघाले...
मला एकदम पंधरा-वीस दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
सिएसटीहून बस पकडून मी दादरच्या दिशेने निघालो होतो. एक वृद्ध ग्रहस्थ बसमध्ये चढले, पण शंभराची नोट सुट्टी नसल्याने आणि वाहकापाशीसुद्धा सुट्टे पैसे नसल्याने त्यांना काय करावं कळेना. क्षणभर घुटमळून ते चालत्या बसमधून उतरले. उतरल्या उतरल्या धडपडले. कदाचित पडलेच असते. सुट्ट्या पैशांअभावी बिचार्यांना थेट हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली असती.
बस प्रवासात ही सुट्टे पैसे मोठी भानगड असते. सीएसटी ते गिरगांव प्रवासाचे आधी सहा रुपये आणि मग आठ रुपये सुट्टे ठेवणे ही मोठीच डोकेदुखी ठरून राहिली होती माझ्यासाठी. चार दिवस सुट्टे द्यावेत तरी पाचव्या दिवशी वाहकाशी भांडण ठरलेले. मग एकदा मी ठरवून टाकले, आजपासून वाहकाशी हुज्जत घालायची नाही. तो असून देत नसला तरी शांत राहावयाचे. देवदयेने आपल्या खिशात पैसे आहेत. दहा रुपयाचे तिकीट घ्यायचे. वाद संपवायचा. मी हे असे ठरवून आता काही वर्षे निघून गेली. मला एकदाही आठऐवजी दहा रुपयाचे तिकीट काढावे लागलेले नाही. एकतर मी सुट्टे पैसे घेऊन जातो. दहाची नोट दिली तर सुट्टे पैसे मिळतात. म्हणजे मिळत आले आहेत.
सुट्टे हा खरे तर मोठाच प्रश्न आहे. एकदा मी खिशात पाचशेची नोट असताना दिवसभरात तिघांकडे सव्वाशे रुपये उधार ठेवले होते. शरम वाटू लागली होती स्वतःची ...
सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. सुट्टे पैसे नसले म्हणजे अनेकदा शारीरिक, मानसिक त्रास होतो आणि आपल्या पैकी अनेक जण मुलांच्या पिगी बँकमधून आणि घरातल्या कपाटातून उगाचच सुट्टे पैसे अडकवून ठेवतात. सुट्टे पैसे चलनात राहिले पाहिजेत. ते असे अडचणीत ठेवू नका. सुट्टे पैसे आणायला रुग्णासोबतच्या माणसाला जेव्हा वणवण करावी लागते ना, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल ते आठवा आणि सुट्टे पैसे साठवून ठेवणे टाळा.
तुम्ही रस्त्यावर गाडी चालवित असताना जर अॅम्ब्युलन्स आली तर तुम्ही काय करता? अॅम्ब्युलन्सला जागा देता ना? सुट्टे पैसे अडवणे, अडवून ठेवणे हे अॅम्ब्युलन्सला जागा न देण्यासारखे आहे. तेव्हा वाट मोकळी करा. सुट्टे पैसे वाहत राहू द्या. ती गंगा मग तुमच्या गरजेला तुमच्यापाशीसुद्धा येईल, काय, आवडला ना विचार?

- वैभव बळीराम चाळके
९७०२ ७२३ ६५२.
९७०२ ७२३ ६५२.
Subscribe to:
Posts (Atom)