Thursday, October 1, 2009

मेघा मिरव मिरव!


निळ्या आकाशात काळ्या

मेघा मिरव मिरव

फुले धरीत्रीच्या

ओठी गाण हिरव हिरव!

गंध मातीला सुटला

रान गंधाळून गेल

मोर नाचतो डोंगरी

त्याच स्वप्न साकारलं

हळुवार पिसांवर

हात फिरव फिरव!

झरा ओढ्याच्या मिठीत

ओढा नदीला बिलगे

खवळल्या समुद्राशी

नदी सलगीने वागे

सागराच्या पोटी सारं

पाणी जिरव जिरव!

कधी शिंपडी शिरवे

झुलायला लाटांवर

कधी रांगोळी गोन्दाया

वाळूमध्ये काठावर

स्वतीसर शिंपल्याच्या

मुखी भरव भरव!

- सुवर्णसुत

1 comment: