मी शोधलेले सुलेखनासाठीचे नवे टूल
तिसरी चौथीच्या वयातच मला शास्त्रज्ञ लोकांची कमाल वाटू लागली होती. भोवतालातील कितीतरी वस्तूंबद्दल मला कौतुक होतं. आपणही शास्त्रज्ञ व्हायचं असं माझ्या बालसुलभ मनाला वाटत होतं. पुढे पाचवीत मूलद्रव्यांचा अभ्यास झाल्यावर वस्तू विस्कटून मूलद्रव्ये आणि मूलद्रव्ये जुऴवून वस्तू बनविण्याची कल्पना सुचली होती. माझा प्रवास योग्यच चालला होता. पण पुढे भाषेची आवड निर्माण झाली आणि शास्त्रज्ञ व्हायचं स्वप्न विरलं...
पण....
पण स्वप्न आतून धडका देत असतात. शास्त्रज्ञाच्या अंगी असलेली चिकाटी होतीच अंगी...त्यातूनच मी बहुदा छत्रीच्या तारा वाकवून त्यांचे घोंगडीसाठी पिन-थडस बनवत असे. त्यांना नक्षीदार बनवताना माझ्या कोवळ्या सुकुमार हाताना कितीतरी यातना झाल्या. पण त्यात सुख होते. ते घाव निर्मितीसाठी सोसलेले होते.
कितीतरी दिवस मी बादलीच्या जाड कडीला ठोकण्यात घालवले. मागच्या पिढीतील कोणीतरी बादलीच्या कडीची एक रिंग करून आणलेली होती. पण तिची दोन टोके जुळलेली नव्हती. ती जुळावीत यासाठी मी कितीतरी तास ती रिंग दगडावर ठोकली असेल. तिच्यातून ठोकताना येणारी कंपने मला शास्त्रज्ञ झाल्याचाच आनंद देत असत. ती टोके कधी जुळली नाहीत. तसे माझे शास्त्रज्ञ व्हायचे स्वप्नही जुळले नाही.
पुढे मुंबईत आलो. कोणीच आपले उरले नाही तेव्हा मित्रांकडे राहू लागलो. ते दोघे सख्खे भाऊ होते. दोघेही कलावंत. एक जेजेचा विद्यार्थी...एक उपजत कलावंत...टूल मेकिंग हा त्याचा आवडता छंद होता. ते त्यांच्या कामासाठी एकाहून एक भारी टूल तयार करीत. टूल म्हणजे आपल्या कामासाठी सुयोग्य साधन.
माझं हस्ताक्षर सुंदर होतंच, पुढे सुलेखनाची आवड निर्माण झाली. मिळेल त्या पेनाने मी सुलेखन करीत बसत असे. सुलेखनाचे पेन महाग. ते परवडत नसत. त्यात त्यांचे आकार दोन-चार-सहा असेच असत. तीन-पाच वगैरे आकार त्यात येतच नसत. म्हणून मी सुलेखनासाठी टूल शोधू लागलो. एक दिवस मला एक हायपोथिसिस सुचला. हायपोथिसिस म्हणजे असे असे होऊ शकेल अशी कल्पना...माझ्या लक्षात आले की आपण निब घासून हवी तेवढी करू शकलो तर कमी खर्चात आपले काम होईल. आपल्याला हव्या त्या आकाराच्या निब करता योतील. हव्या त्या आकाराची अक्षरे काढता येतील.
मग मी कामाला लागलो. झपाटल्यासारखा दिसेल त्या वस्तूवर निब घासू लागलो. कितीतरी प्रकारचे धातू...कितीतरी प्रकारची कापडे...कितीतरी प्रकारची लाकडे...मी निब घासत राहिलो. अपयशाच्या पायर्यांवर पायर्या रचल्या. यशाच्या दिशेन पुढे जात राहिलो. सहा महिने हा उद्योग सुरू होता.
एकदा गावी गेलो असता, तिथे हाच उद्योग सुरू केला. तिथल्या तर्हेतर्हेच्या दगडांवर निबा घासून पाहिल्या.
आणि युरेका...मला निब सहज घासून हवी तेवढी करणारा दगड सापडला! घरात चंदन उगाऴायची सहाण होती. ती कामास आली. माझा शोध पूर्ण झाला. सहाणेवर निब घासली की हवा तो आकर सहज मिळू लागला. मी बेहद खूश झालो. सहा महिन्यांच्या कष्टाला यश आले. मोगरा फुलला...मोगरा फुलला...
मी आता सुलेखन करीत नाही. इतर कामे आणि छंदांतून वेळच नाही. पण लहर आली की एखादा शब्द, एखादी काव्यपंक्ती लिहून काढतो. पण आज सुलेखनातील अनेक जण माझ्या परिचयाचे आहेत. त्या सर्वांसाठी हे मी शोधलेले टूल जाहीर करतोय. सर्वांनी वापरा...आपले वजन मिऴवा....
- वैभव बळीराम चाऴके
९७०२७२३६५२

No comments:
Post a Comment