रात्री टाईमपास नको... (409)
महाविद्यालयात मुलांना शिकविताना मी मुद्दामच अभ्यासक्रमाबाहेरच्या काही गोष्टी मुलांना शिकवीत असतो. गुरुकुल पद्धतीचा हा वारसा मला माझ्या गुरुजनांकडून मला मिळालेला आहे अभ्यासक्रमातली एखादी गोष्ट राहून गेली तरी चालेल, पण मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशा, आपल्याला माहिती असलेल्या शक्य तेवढ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, असा हा सर्वांगीण शिक्षणाचा वारसा मी माझ्यापरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो.
गेल्या वर्षी एकदा वर्गात मुलांना विचारले, तुमच्यापैकी किती जण टीव्हीवरच्या मालिका पाहतात? वर्गातल्या निम्म्या मुलांनी हात वरती केले. मी प्रत्येक जण साधारण किती मालिका पाहतो, हे विचारल्यावर एका कन्येनं ती एकसलग पाच मालिका पाहात असल्याचं तिनं सांगितलं. मी तिला उद्यापासून कोणती तरी एकच मालिका पाहण्याची अट घातली आणि मग वर्षभर ती टीव्ही पाहण्यात किती वेळ वाया घालवते, याची चौकशी करीत राहिलो.
स्मार्टफोन हातात आल्यापासून फक्त तरुण पिढीचाच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांचा रात्रीचा कितीतरी वेळ मोबाईलवर टाईमपास करण्यात जातो, ही गोष्ट लक्षात आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना रात्री टाइमपास करायचा नाही, अशी अट स्वतःलाच घालण्याचा सल्ला दिला.
त्याचे कारणही मी त्यांना सविस्तर समजावून सांगितले. ते त्यांना क्षणात समजले. पटलेही. ते तुम्हालाही पटेल याची मला खात्री आहे.
मित्रांनो, रात्र वाईट... अंधार वाईट... तो वाईट गोष्टींना निमंत्रण देतो... असेच संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केलेले आहेत. स्मार्टफोनच्या निमित्ताने आपण सारे हे नव्याने अनुभवतो आहोत. म्हणजे पाहा, तुम्ही रात्री दहा वाजता मोबाईलवर एखादी वेबसिरीज किंवा एखादा मोठा सिनेमा पाहिला घेतलात किंवा युट्युब किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहत राहिलात, तर तासांमागून तास खर्च झाले तरी तुम्हाला त्याचे भान राहत नाही, असे तुमच्या लक्षात येईल. रात्री दहाला सुरु केलेली वेबसिरीज पहाटे चार पाच वाजेपर्यंत पाहणार्या तरुण मुलांची संख्या, आपल्या देशातसुद्धा लाखाच्या घरात असेल. निव्वळ टाईमपास म्हणून रात्री दोन-चार तास सहज खर्च करणार्या नागरिकांची संख्या काही कोटीच्या घरात असेल, हे सांगण्यासाठी सर्व्हे करण्याची आवश्यकता नाही.
गंमत आहे पाहा, समजा तुम्ही दिवसा पाच तास एखादी वेबसिरीज पाहत राहिलात किंवा दिवसाचे पाच तास तुम्ही युट्युबवर किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यात घालवलात किंवा एखादा ऑनलाईन गेम खेळण्यात घालविलात, एवढेच काय, पत्ते कुटण्यात, क्रिकेट खेळण्यात कॅरम खेळण्यात किंवा टीव्ही पाहण्यात जरी तुम्ही पाच तास खर्च केलात, तरी तुम्हाला त्याबद्दल अपराधीपणाची भावना वाटत.े रात्री मात्र खर्च केलेला वेळ आपल्याला अपराधाची भावना देत नाही. दिवस आणि रात्र यांच्यात हा एक मोठाच फरक आहे, जो आपल्या सहज लक्षात येत नाही.
माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला हा सल्ला, म्हणूनच आज मी आपणास, सर्व मित्रांना, ज्येष्ठांना आणि चिमुकल्यांनासुद्धा देतो आहे- रात्री टाईमपास करू नका.
हा एक सल्ला मानलात तर तुमचे कितीतरी मानवी तास तुम्ही वाचवू शकाल. आपले वाचणारे लाखो-करोडो मानवी तास आपल्या ही समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेतलात, म्हणजे हा सल्ला केवढा मोलाचा आहे, हे तुमच्या सहज लक्षात येईल.
सँडविच करायला शिका (421)
काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच. अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या माध्यामातून शिकवण देणारा एक किस्सा कळाला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आमि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.
सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असते.
स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा हे सांगण्याचा माझा हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे माझ्या पदरचे नाही, पण मला भावलेले, मला विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवं, असं सतत वाटायला लावणारं आहे.
मी अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख मला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.
जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही असे वाटते. ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलात तर ती चूक ऐकणारालाही सुधारावी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही
ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही मला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा. अनेकदा आपण माणसांना आपण उगाच दुखावत असतो. अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या संडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.
विश्वासावर जग चालतं...(437)
आजकाल कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही, असे आपण वरचेवर म्हणत असतो. तरी विश्वास नावाचं मूल्य कितीतरी महत्त्वाचं आहे हे आपण जाणतोच. फसवणुकीच्या कितीतरी बातम्या आपण रोजच्या रोज वाचतअसतो. अशा वेळी मी तुम्हाला विश्वासावर जग चालते म्हटले तर तुम्हा मला वेड्यात काढाल. पण थांबा...
दोन छोट्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी काय सांगतो तेे सहज लक्षात येईल. एकदा एक विमान हवेत असताना त्यात बिघाड होतो आणि विमान वेगाने खाली येऊ लागते. तेव्हा सगळेच प्रवासी भयभित होतात. एक छोटी कन्या फक्त निर्भय असते. एक माणूस काळजीनं तिला विचारतो, तुला भीती वाटत नाही का... ती म्हणते, बिलकुल वाटत नाही. कारण या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत आणि मला विश्वास आहे की, ते हे विमान कोसळून देणार नाहीत.
दुसरी गोष्ट आहे सीमेवर लढत असलेल्या दोन सैनिकांची. बलवीर आणि दलवीर अशी त्यांची नावे. बलवीर जखमी होऊन पडला. दलवीर आपल्या सहकार्यांसह बलवीरपासून काहीशे फूट अंतरावर होता. बलवीर शेवटच्या घटका मोजत होता. पण त्याला वाटत होतं की, दलवीर आपल्याला भेटायला येईल.
दलवीरला सहकारी सांगत होते नको जाऊ, आता तो तसाही वाचणार नाही. पण सुसाट वेगाने येणार्या गोळ्या चुकवत दलवीर काही क्षणात त्या ठिकाणी पोहचला. बलवीरने त्याच्याकडे कृतार्थ नजरेनं पाहिलं आणि कायमचे डोळे मिटले. दलवीर येणार हा विश्वास सार्थ झाल्याने त्या शेवटच्या क्षणी बलबीरला जो आनंद झाला त्याला उपमा नाही. आणि आपण आपल्या मित्राच्या विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद दलवीरला आयुष्यभर ताकद देत राहिला.
मित्रांनो, विश्वासाची गोष्ट अशी आहे. आपण कितीही कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही असं म्हणत असलो तरी आपलं सगळं जीवन हे परस्परांच्या विश्वासावर अवलंबलेलं आहे.
थोडा विचार करून पाहा... तुमच्याही हे सहज लक्षात येईल.
आपण ज्या गाडीने प्रवास करतो, त्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण ओळखत नसतो, पण तो ड्रायव्हर गाडी नीट चालवेल याचा आपल्याला विश्वास असतो. आपण ज्या रस्त्याने चालत असतो त्या रस्त्याने हजारो वाहने जात असतात. त्यातला एकही ड्रायव्हर आपल्या अंगावर गाडी घालून आपल्याला चिरडून ठार मारणार नाही, हा विश्वास आपल्या मनात असतो, म्हणूनच आपण रस्त्यानं निर्धास्तपणे चालू शकतो. कोणत्या तरी इलेक्ट्रिशनने लावलेल्या पंख्याखाली आपण निर्धास्तपणे हवा घेऊ शकतो, कारण त्याच्या कामावर आपण विश्वास टाकलेला असतो. कोणत्याही हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण घेतो तेव्हा तिथल्या आचार्याने या अन्नात विष कालवलेलं नाही यावर आपला ठाम विश्वास असतो, नाही का... आपल्या एकूण जगण्यालाच विश्वासाचं अतिष्ठान लागतं.
जसं हे दुसर्यांच्या विश्वासावरचं आहे, तसंच अगदी आपल्या स्वतःवरच्या विश्वासाचं आहे. लोक मोठमोठे पराक्रम करतात ते त्यांच्यात शक्ती असते, बुद्धी असते, म्हणूनच नव्ह,े तर असा काही पराक्रम आपण करू शकतो, असा विश्वास त्यांच्यापाशी असतो, म्हणूनच ते ती गोष्ट करू शकतात. प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल हा विश्वास असल्याशिवाय कोणताही खेळाडू मुळात मैदानावर उतरतच नाही. आपल्या जीवनाच्या मैदानावर आपण आयुष्य नावाची खेळ करीत असतो. तेव्हा आपल्याला जगता येईल, आपल्याला आनंदाने जगता येईल, उत्तम जगता येईल, हा विश्वास आपल्यापाशी असायला हवा.
सावधानता हवीच, पण तरीही इतरांवर विश्वास ठेवायला. जग विश्वासावर चालतं.
गोष्टीची गरज (436)
गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावं... आजी गोष्ट सांग ना, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.
आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे
यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. तिला ओलाव्याचा अभाव असला तरी तिथे ती उपलब्ध आहे. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.
मुलांसाठी काम करीत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.
गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असं नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्याचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे.
काही महिन्यांपूर्वी ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात, असं वाटतं. आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. त्यांच्यातली एक कथाकथनकर्ती म्हणाली, भाषा जतन करण्याचा हा एक उत्तम मार्ग म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत.
खरं तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केलं तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्तानं आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजी-हिंदीच्या रेट्यखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

No comments:
Post a Comment