Monday, January 20, 2020



कुठे वाजला पावा ग?

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके 9702723652 )


त्याचं तिचं बोलगाणं

माझं गाणं प्रिये तुला गाता यायला हवं
आणि तुझ्या गाण्यात मला न्हाता यायला हवं

एक गाणं लिहीन मी चंद्र सूर्य तार्‍यावर
एक गाणं लिहिणे पानं-फुलं वाऱ्यावर
ताऱ्याचं गाणं म्हणताना तारा व्हायचं
वाऱ्याचं गाणं म्हणताना वारा व्हायचं
वार्यासंगे दूरदूर जाता यायला हवं

एक गाणं गोजिरवाणं लिहीन मी तुझ्यावर
एक गाणं आनंदानं लिहीन तुझ्या राजावर
राजालाही राणीसंगे गाता यायला हवं
राणीलाही राजासंगे न्हाता यायला हवं
गाण्यासंगे गाण्याला एक होता यायला हवं

एक गाणं शब्दाविना नुसते नुसते सुर
एक गाणं ज्याच्यामधून सूरसुद्धा दूर
शब्दांच्याही पलीकडचे दिसू लागते काही
अब्दअब्द मनातले साकार रूप घेई
गाणं सगळेच ऐकतात गाणं पाहता यायला हवं
(
सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

युगामागुनी युगे निघून गेली, पण राधाकृष्णाची प्रीतकथा आजही प्रत्येक भारतीयाने ह्रदयकप्प्यात जपून ठेवली आहे. राधाकृष्ण हा इतिहास असेल किंवा कुण्या कवीला पडलेले ते गोड काव्यस्वप्न... पण एवढसं बी युगानुयुगे अनेक कलावंत शिंपत आले आहेत.
आणि म्हणूनच तर राधाकृष्ण ही रूपकवेल हर रसिकाच्या मनात रूजले... बहरलेय... ती बहरलेय तरी तिचं बहरणं थांबलेलं नाही. ती सदाफुली आहे... सतत फुलत राहणारी. राधाकृष्ण हे रूपक आहे स्त्री-पुरुष नात्याचा... त्यांच्यातल्या प्रेमसंबंधात... त्यांच्या गोड मिलनाची.  ही कथा आहे उमलण्याची... फुलण्याची... बहरण्याची... आणि वाऱ्यावर मनसोक्त हिंदळण्याची.. पण ही कथा म्हणजे नुसताच गोडवा नाही... या नितांत सुंदर कथेला दुःखाची भरजरी किनार आहे. ज्यांना हे भरजरी दुःखं अनुभवता येतं त्या सगळ्यांच्या आयुष्याला राधाकृष्णाचा परिसस्पर्श होऊन जातो. मग कधीतरी आपल्यातलाच कुणी कृष्ण होतो... आपल्यातलीच कुणी राधा होते... प्रीतवेलीला एक नवं फुल येतं... कवी म्हणतो....

राधाकृष्ण जुनी जोडी
पुन्हा पुन्हा होते नवी
नव्या राधाकृष्णासाठी
नवी गीते नवा कवी

काल आहे हे नवेपण?
तिचं रडणं... त्याचं समजावणं... हे नेहमीचंच... पण...

पाहिले आहे का कुणी
कृष्णदेव रडताना
गाली ओघळले त्याचे
अश्रू राधा पुसताना

राधा किती समजूतदार असली तरी त्याचे उशिरा येणं  काही थांबत नाही. अशा वेळी तिची अवस्था काय होते?

सावळ्या रे भेट आता
नको करूस उशीर
हळव्या मनाची राधा
जीव होतो खाली वर

त्याला यायला उशीर होतो हे खरं, पण मग तो आहे तरी कुठे? करतोय तरी काय?

राधे तुझा कृष्ण सखा
वाजवी बासरी रानी
बासरीचा सूर बोले
येई राधे येई राणी

सावळ्या रे तुझ्यासाठी
गाते राधाबाई
त्याची तुझ्या बासरीला
चाहूल का नाही?

आणि मग त्या दोघांची भेट होते...
पहाटेचा गार वारं
राधा कृष्णसवे चाले
गोड शहार्याने
अंग सुखावले

यमुनेच्या तीरावर
कान्हा वाजवी बासरी
राधा वेडी वेडावली
झाली कावरीबावरी

कृष्णाविना राधेला या
नको दुजा कोणी
वेडावून गेला तिला
बासरीचा ध्वनी

आषाढाच्या पावसाने
पूर यमुनेला आला
राधा अति घाबरली
कृष्ण सावरतो तिला

पण कधीतरी एक असाही दिवस येतो...

पैलतिरी राधा
मधी यमुनेला पूर
उडी घाली कृष्ण
तिचा धपापतो ऊर

पूर आला की  यमुना  रौद्र रूप धारण करते. पण  एरवी यमुना इतकी सुखद असते की...

माझे सखे माझे प्रिये
कृष्ण म्हणे जाऊ जळी
मनसोक्त डुंबू करू
एका डोहात अंघोळी

गौरांगी ह्या गोपी न्हाती
यमुनेच्या जळी
कृष्ण येता लाजल्या ग
मोगरीच्या वेली

स्नानासाठी राधा जाते
यमुनेच्या तिरी
कृष्णाची पाउले तिच्या
पावलांच्या वरी

केळी मागे नदीकाठी
न्हाते राधाबाई
कोणती केळ त्यातली
कळेनाच काही

विसाव्याचे राधाबाई
यमुनेच्या तिरी
बसणार एवढ्यात
वाजली बासरी

वेड्या माझ्या राजा कृष्णा
तुला कशी समजाऊ
तुझा राग जाण्यासाठी
कोणते मी गाणे गाऊ

कृष्णा तुझ्या प्रेमापुढे
राधा मी आंधळी होते
तुझ्या प्रेमाच्या पाठीशी
सांग गुपित कोणते...

हेच आंधळेपण तिला त्याच्यामागे धावायला लावते...

कृष्णा आज गोकुळात
सैरावैरा धावू लागे
काय झाले उमगेना
राधा त्याच्या मागे मागे

आणि मग...

मुकुंदाच्या जीवनात
राधिकेच येणं झालं
पहिल्याच मिठीमध्ये
जीवनाच सोनं झालं

राधिकेचे ओठ आज
श्रीकृष्णाच्या ओठी आले
कसे सांगू शब्दांमध्ये
अमृताचे फूल फुले

पण म्हणून ते स्वैराचारी झाली नाहीत. नीतीची भीती कुठेतरी जागी आहेच... म्हणूनच तर...

सांगायचे खुप राधे
परी वाटे भीती
दटावतै सभ्यता नि
भिवविते नीती

राधा म्हणे कृष्णा नको
नको करू असे
चारचौघांमध्ये माझे
होईल ना हसे...

आई ओरडेल आता
राधेच्या मनात भीती
तरी जाता जाता तिचे
ओठ कृष्णाला चुंबिती

गोजिरी ही भेट राधे
दिली तुला कोणी
आणि गुणी सखा माझा
कृष्ण चक्रपाणी

जेव्हा तिच्या स्वप्नांमध्ये
येतो चक्रपाणि
त्याच्यासाठी राधा गाते
झोपेतच गाणी

कृष्णासाठी वेडी झाली राधा झोपतही गाऊ लागते. आता कृष्णाच्या बासरीचा थ्वनी आला की राधा कावरीबावरी होऊ लागते...

कुठे वाजला पावा ग...
कुठे वाजला पावा ग
हा तर माझा रावा गं
लपून बसला कृष्ण सावळा
कुणीतरी मजला दावा गं
असाच करतो
जीव मम झुरतो
किती करू या याचा धावा ग
रिमझिम गाणी
तनभर पाणी
त्यात सोडतो नावा ग
पाऊसधारा
मोरपिसारा
सुरेख संगम झाला ग
कुठे वाजला पावा ग
हा तर माझा रावा ग 


त्या राधेवरच्या या कविता ऐकून आजच्या राधेला प्रश्न पडतो...
का रे लक्ष कविता या
माझ्या देहावर
तुझ्या देही जन्म राधे
जीवनसागर

हा प्रश्न विचारणारी राधा आणि तिचा कृष्ण तुमच्याआमच्यातीलच... या आजच्या राधाकृष्णाचं जगणं कसं आहे... तर हे असं आहे...

नटूनथटून राधे
जाताना बाजारी
इस्त्री कशी मोडली ग
भेटला ना हरी?

जिन्यावरून नकळत
झाला तुझा स्पर्श
राधे माझे वाया गेले
एक पूर्ण वर्ष

हरवेळी फोन राधे
घेते तुझी आई
फोन करणारा मग
बोलतच नाही

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन

रोज डे...

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन
धुंद ढगावर जाते
वीज कोसळून

तुझ्यासाठी सर येते
जाते कोसळून
काय राधे मिळे तुला
वर्गात बसून... 


नको रागावून अशी
राधे रुसून राहूस
रिमझिम पडणारा
जातो फुकट पाऊस

त्याच्या छत्रीतून राधा
फिरायला जाते
दोन्ही अपराध छत्री
पोटात घालते

राधा म्हणे किती वेळा
सांगितले तुला
तुझे माझे गोड गाणे
सांगू नको तिला

हा तिचा पझेसिव्हनेस...

नको कँटीन नि कट्टा
नको हॉटेलबिटेल
राधे चौपाटीला जाऊ
खाऊ चणे खाऊ भेळ

आणि हा एक वेगळाच रंग...

आता तीन महिन्यांनी
लागे पुन्हा डिफॉल्टर
माझ्या संख्या कृष्णा तुझा
बघ पहिला नंबर

कृष्णसखा सगळ्यांना
सांगत सुटला
मॅथ्स गेला तरी माझा
फिजिक्स सुटला

राधा फेल झाली
आला आसवांना पूर
कृष्ण धीर देतो
दूर नाही आक्टोबर

किती वेळा सांगू तुला
घे ना मोबाईल
कृष्ण म्हणे कोण त्याचे
भरणार बिल

एक एवढंच करू
मला स्टेशनला सोड
कृष्ण म्हणे टॅक्सीने जा
हे घे मीच देतो भाडं

एक दिवस राधा-कृष्णाचे लग्न होते त्यांचा संसार सुरू होतो आणि मग दोघे तर प्रेम जीवनातून गद्याकडे सरकणाऱ्या मुक्तछंदात येतात. अर्थात पण म्हणून नात्यातला गोडवा कमी होत नाही...

एकदा राधा कृष्णाला म्हणाली
तू माझे फोटो लाईक करत नाहीस...
कृष्ण म्हणाला
तुझा चेहऱ्यावरून नजर हटत नाही आणि लाईक कोसो मैल दूर आहे तुझ्या चेहर्‍यापासून...

राधेनं एकदा विचारलं
तुझ्या क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय रे
कृष्ण म्हणाला
जन्मतारीख
राधेनं विचारलं
कोणाची...तुझी की माझी...
कृष्ण म्हणाला
नाही तुझ्या माझ्या नात्याची...
राधा समजून गेली 14 0 2..

राधेनं विचारलं
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी इतक्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू?
कृष्ण म्हणाला
तुलाही जमेल...
फक्त येणारा प्रत्येक माणूस तुझ्या माहेरहून आला आहे असा विचार करत जा...

कृष्णाने एकदा राधेला विचारलं
तू महायुतीत की महाआघाडीत?
राधा लाजत म्हणाली
कोण? मी?
मी सत्तेत...

एकदा राधा घाबरली आणि कृष्णाला बिलगली
कृष्णाने तिच्या पाठीवरून हात फिरवत
तिला धीर दिला
राधा म्हणाली
हे असे युगानुयुगे राहता येईल का रे
कृष्ण म्हणाला
येईल पण फक्त मग बासरी वाजवता येणार नाही राधेने चटकन मिठी सोडून
ओठांवर ओठाची बासरी ठेवली...

कृष्ण डिप्रेस झाला तेव्हा
राधेने त्याच्यासाठी बासरी वाजवायला घेतली
तिला सा सुद्धा नीट लावता आला नाही
पण बासरीला छडी समजून
डिप्रेशन घाबरून पळून गेले...

लोकल लटकताना कृष्ण म्हणाला कालियामर्दनावेळी अशी कसरत करायला लागली होती...


राधा कृष्णाचे प्रेम हे धर्म, जाती, संस्कृतीच्या पल्याड जाणार होतं. परिस्थितीची किल्मिषे त्याला कधी चिकटली नाहीत. म्हणूनच राधाकृष्ण नित्य स्मरणीय आहेत. अनुकरणीय आहेत. कृष्ण म्हणतो...

एक काळ असा होता
मीच होतो कृष्ण
नाही उगवला कधी
संस्कृतीचा प्रश्न

आणि म्हणूनच...

कृष्ण गेला दूर जेव्हा
सोडून गोकुळ
राधेसवे आईसुद्धा
व्याकुळ व्याकुळ

किती राधाकृष्ण आले
जग फुलवून गेले
इतिहासाच्या पानात
गंध त्यांचा दरवळे

राधाकृष्ण येतात, जग फुलतात आणि निघून जातात. इतिहासाच्या पानात त्यांचा गंध दरवळत राहतो, पण अशी दरवळणारी धरणी राधा आणि तिचा निळासावळा गगन कृष्ण यांचे प्रेम अनादी काळापासून चालत आले आणि अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे...

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

कुठे वाजला पावा ग?

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )


त्याचं तिचं बोलगाणं

माझं गाणं प्रिये तुला गाता यायला हवं
आणि तुझ्या गाण्यात मला न्हाता यायला हवं

एक गाणं लिहीन मी चंद्र सूर्य तार्‍यावर
एक गाणं लिहिणे पानं-फुलं वाऱ्यावर
ताऱ्याचं गाणं म्हणताना तारा व्हायचं
वाऱ्याचं गाणं म्हणताना वारा व्हायचं
वार्यासंगे दूरदूर जाता यायला हवं

एक गाणं गोजिरवाणं लिहीन मी तुझ्यावर
एक गाणं आनंदानं लिहीन तुझ्या राजावर
राजालाही राणीसंगे गाता यायला हवं
राणीलाही राजासंगे न्हाता यायला हवं
गाण्यासंगे गाण्याला एक होता यायला हवं

एक गाणं शब्दाविना नुसते नुसते सुर
एक गाणं ज्याच्यामधून सूरसुद्धा दूर
शब्दांच्याही पलीकडचे दिसू लागते काही
अब्दअब्द मनातले साकार रूप घेई
गाणं सगळेच ऐकतात गाणं पाहता यायला हवं
(
सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

युगामागुनी युगे निघून गेली, पण राधाकृष्णाची प्रीतकथा आजही प्रत्येक भारतीयाने ह्रदयकप्प्यात जपून ठेवली आहे. राधाकृष्ण हा इतिहास असेल किंवा कुण्या कवीला पडलेले ते गोड काव्यस्वप्न... पण एवढसं बी युगानुयुगे अनेक कलावंत शिंपत आले आहेत.
आणि म्हणूनच तर राधाकृष्ण ही रूपकवेल हर रसिकाच्या मनात रूजले... बहरलेय... ती बहरलेय तरी तिचं बहरणं थांबलेलं नाही. ती सदाफुली आहे... सतत फुलत राहणारी. राधाकृष्ण हे रूपक आहे स्त्री-पुरुष नात्याचा... त्यांच्यातल्या प्रेमसंबंधात... त्यांच्या गोड मिलनाची.  ही कथा आहे उमलण्याची... फुलण्याची... बहरण्याची... आणि वाऱ्यावर मनसोक्त हिंदळण्याची.. पण ही कथा म्हणजे नुसताच गोडवा नाही... या नितांत सुंदर कथेला दुःखाची भरजरी किनार आहे. ज्यांना हे भरजरी दुःखं अनुभवता येतं त्या सगळ्यांच्या आयुष्याला राधाकृष्णाचा परिसस्पर्श होऊन जातो. मग कधीतरी आपल्यातलाच कुणी कृष्ण होतो... आपल्यातलीच कुणी राधा होते... प्रीतवेलीला एक नवं फुल येतं... कवी म्हणतो....

राधाकृष्ण जुनी जोडी
पुन्हा पुन्हा होते नवी
नव्या राधाकृष्णासाठी
नवी गीते नवा कवी

काल आहे हे नवेपण?
तिचं रडणं... त्याचं समजावणं... हे नेहमीचंच... पण...

पाहिले आहे का कुणी
कृष्णदेव रडताना
गाली ओघळले त्याचे
अश्रू राधा पुसताना

राधा किती समजूतदार असली तरी त्याचे उशिरा येणं  काही थांबत नाही. अशा वेळी तिची अवस्था काय होते?

सावळ्या रे भेट आता
नको करूस उशीर
हळव्या मनाची राधा
जीव होतो खाली वर

त्याला यायला उशीर होतो हे खरं, पण मग तो आहे तरी कुठे? करतोय तरी काय?

राधे तुझा कृष्ण सखा
वाजवी बासरी रानी
बासरीचा सूर बोले
येई राधे येई राणी

सावळ्या रे तुझ्यासाठी
गाते राधाबाई
त्याची तुझ्या बासरीला
चाहूल का नाही?

आणि मग त्या दोघांची भेट होते...
पहाटेचा गार वारं
राधा कृष्णसवे चाले
गोड शहार्याने
अंग सुखावले

यमुनेच्या तीरावर
कान्हा वाजवी बासरी
राधा वेडी वेडावली
झाली कावरीबावरी

कृष्णाविना राधेला या
नको दुजा कोणी
वेडावून गेला तिला
बासरीचा ध्वनी

आषाढाच्या पावसाने
पूर यमुनेला आला
राधा अति घाबरली
कृष्ण सावरतो तिला

पण कधीतरी एक असाही दिवस येतो...

पैलतिरी राधा
मधी यमुनेला पूर
उडी घाली कृष्ण
तिचा धपापतो ऊर

पूर आला की  यमुना  रौद्र रूप धारण करते. पण  एरवी यमुना इतकी सुखद असते की...

माझे सखे माझे प्रिये
कृष्ण म्हणे जाऊ जळी
मनसोक्त डुंबू करू
एका डोहात अंघोळी

गौरांगी ह्या गोपी न्हाती
यमुनेच्या जळी
कृष्ण येता लाजल्या ग
मोगरीच्या वेली

स्नानासाठी राधा जाते
यमुनेच्या तिरी
कृष्णाची पाउले तिच्या
पावलांच्या वरी

केळी मागे नदीकाठी
न्हाते राधाबाई
कोणती केळ त्यातली
कळेनाच काही

विसाव्याचे राधाबाई
यमुनेच्या तिरी
बसणार एवढ्यात
वाजली बासरी

वेड्या माझ्या राजा कृष्णा
तुला कशी समजाऊ
तुझा राग जाण्यासाठी
कोणते मी गाणे गाऊ

कृष्णा तुझ्या प्रेमापुढे
राधा मी आंधळी होते
तुझ्या प्रेमाच्या पाठीशी
सांग गुपित कोणते...

हेच आंधळेपण तिला त्याच्यामागे धावायला लावते...

कृष्णा आज गोकुळात
सैरावैरा धावू लागे
काय झाले उमगेना
राधा त्याच्या मागे मागे

आणि मग...

मुकुंदाच्या जीवनात
राधिकेच येणं झालं
पहिल्याच मिठीमध्ये
जीवनाच सोनं झालं

राधिकेचे ओठ आज
श्रीकृष्णाच्या ओठी आले
कसे सांगू शब्दांमध्ये
अमृताचे फूल फुले

पण म्हणून ते स्वैराचारी झाली नाहीत. नीतीची भीती कुठेतरी जागी आहेच... म्हणूनच तर...

सांगायचे खुप राधे
परी वाटे भीती
दटावतै सभ्यता नि
भिवविते नीती

राधा म्हणे कृष्णा नको
नको करू असे
चारचौघांमध्ये माझे
होईल ना हसे...

आई ओरडेल आता
राधेच्या मनात भीती
तरी जाता जाता तिचे
ओठ कृष्णाला चुंबिती

गोजिरी ही भेट राधे
दिली तुला कोणी
आणि गुणी सखा माझा
कृष्ण चक्रपाणी

जेव्हा तिच्या स्वप्नांमध्ये
येतो चक्रपाणि
त्याच्यासाठी राधा गाते
झोपेतच गाणी

कृष्णासाठी वेडी झाली राधा झोपतही गाऊ लागते. आता कृष्णाच्या बासरीचा थ्वनी आला की राधा कावरीबावरी होऊ लागते...

कुठे वाजला पावा ग...
कुठे वाजला पावा ग
हा तर माझा रावा गं
लपून बसला कृष्ण सावळा
कुणीतरी मजला दावा गं
असाच करतो
जीव मम झुरतो
किती करू या याचा धावा ग
रिमझिम गाणी
तनभर पाणी
त्यात सोडतो नावा ग
पाऊसधारा
मोरपिसारा
सुरेख संगम झाला ग
कुठे वाजला पावा ग
हा तर माझा रावा ग 


त्या राधेवरच्या या कविता ऐकून आजच्या राधेला प्रश्न पडतो...
का रे लक्ष कविता या
माझ्या देहावर
तुझ्या देही जन्म राधे
जीवनसागर

हा प्रश्न विचारणारी राधा आणि तिचा कृष्ण तुमच्याआमच्यातीलच... या आजच्या राधाकृष्णाचं जगणं कसं आहे... तर हे असं आहे...

नटूनथटून राधे
जाताना बाजारी
इस्त्री कशी मोडली ग
भेटला ना हरी?

जिन्यावरून नकळत
झाला तुझा स्पर्श
राधे माझे वाया गेले
एक पूर्ण वर्ष

हरवेळी फोन राधे
घेते तुझी आई
फोन करणारा मग
बोलतच नाही

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन

रोज डे...

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन
धुंद ढगावर जाते
वीज कोसळून

तुझ्यासाठी सर येते
जाते कोसळून
काय राधे मिळे तुला
वर्गात बसून... 


नको रागावून अशी
राधे रुसून राहूस
रिमझिम पडणारा
जातो फुकट पाऊस

त्याच्या छत्रीतून राधा
फिरायला जाते
दोन्ही अपराध छत्री
पोटात घालते

राधा म्हणे किती वेळा
सांगितले तुला
तुझे माझे गोड गाणे
सांगू नको तिला

हा तिचा पझेसिव्हनेस...

नको कँटीन नि कट्टा
नको हॉटेलबिटेल
राधे चौपाटीला जाऊ
खाऊ चणे खाऊ भेळ

आणि हा एक वेगळाच रंग...

आता तीन महिन्यांनी
लागे पुन्हा डिफॉल्टर
माझ्या संख्या कृष्णा तुझा
बघ पहिला नंबर

कृष्णसखा सगळ्यांना
सांगत सुटला
मॅथ्स गेला तरी माझा
फिजिक्स सुटला

राधा फेल झाली
आला आसवांना पूर
कृष्ण धीर देतो
दूर नाही आक्टोबर

किती वेळा सांगू तुला
घे ना मोबाईल
कृष्ण म्हणे कोण त्याचे
भरणार बिल

एक एवढंच करू
मला स्टेशनला सोड
कृष्ण म्हणे टॅक्सीने जा
हे घे मीच देतो भाडं

एक दिवस राधा-कृष्णाचे लग्न होते त्यांचा संसार सुरू होतो आणि मग दोघे तर प्रेम जीवनातून गद्याकडे सरकणाऱ्या मुक्तछंदात येतात. अर्थात पण म्हणून नात्यातला गोडवा कमी होत नाही...

एकदा राधा कृष्णाला म्हणाली
तू माझे फोटो लाईक करत नाहीस...
कृष्ण म्हणाला
तुझा चेहऱ्यावरून नजर हटत नाही आणि लाईक कोसो मैल दूर आहे तुझ्या चेहर्‍यापासून...

राधेनं एकदा विचारलं
तुझ्या क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय रे
कृष्ण म्हणाला
जन्मतारीख
राधेनं विचारलं
कोणाची...तुझी की माझी...
कृष्ण म्हणाला
नाही तुझ्या माझ्या नात्याची...
राधा समजून गेली 14 0 2..

राधेनं विचारलं
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी इतक्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू?
कृष्ण म्हणाला
तुलाही जमेल...
फक्त येणारा प्रत्येक माणूस तुझ्या माहेरहून आला आहे असा विचार करत जा...

कृष्णाने एकदा राधेला विचारलं
तू महायुतीत की महाआघाडीत?
राधा लाजत म्हणाली
कोण? मी?
मी सत्तेत...

एकदा राधा घाबरली आणि कृष्णाला बिलगली
कृष्णाने तिच्या पाठीवरून हात फिरवत
तिला धीर दिला
राधा म्हणाली
हे असे युगानुयुगे राहता येईल का रे
कृष्ण म्हणाला
येईल पण फक्त मग बासरी वाजवता येणार नाही राधेने चटकन मिठी सोडून
ओठांवर ओठाची बासरी ठेवली...

कृष्ण डिप्रेस झाला तेव्हा
राधेने त्याच्यासाठी बासरी वाजवायला घेतली
तिला सा सुद्धा नीट लावता आला नाही
पण बासरीला छडी समजून
डिप्रेशन घाबरून पळून गेले...

लोकल लटकताना कृष्ण म्हणाला कालियामर्दनावेळी अशी कसरत करायला लागली होती...


राधा कृष्णाचे प्रेम हे धर्म, जाती, संस्कृतीच्या पल्याड जाणार होतं. परिस्थितीची किल्मिषे त्याला कधी चिकटली नाहीत. म्हणूनच राधाकृष्ण नित्य स्मरणीय आहेत. अनुकरणीय आहेत. कृष्ण म्हणतो...

एक काळ असा होता
मीच होतो कृष्ण
नाही उगवला कधी
संस्कृतीचा प्रश्न

आणि म्हणूनच...

कृष्ण गेला दूर जेव्हा
सोडून गोकुळ
राधेसवे आईसुद्धा
व्याकुळ व्याकुळ

किती राधाकृष्ण आले
जग फुलवून गेले
इतिहासाच्या पानात
गंध त्यांचा दरवळे

राधाकृष्ण येतात, जग फुलतात आणि निघून जातात. इतिहासाच्या पानात त्यांचा गंध दरवळत राहतो, पण अशी दरवळणारी धरणी राधा आणि तिचा निळासावळा गगन कृष्ण यांचे प्रेम अनादी काळापासून चालत आले आणि अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे...

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके 9702723652 )


Tuesday, November 19, 2019

काही लेख

रात्री टाईमपास नको... (409)



महाविद्यालयात मुलांना शिकविताना मी मुद्दामच अभ्यासक्रमाबाहेरच्या काही गोष्टी मुलांना शिकवीत असतो. गुरुकुल पद्धतीचा हा वारसा मला माझ्या गुरुजनांकडून मला मिळालेला आहे अभ्यासक्रमातली एखादी गोष्ट राहून गेली तरी चालेल, पण मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशा, आपल्याला माहिती असलेल्या शक्य तेवढ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, असा हा सर्वांगीण शिक्षणाचा वारसा मी माझ्यापरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो.

गेल्या वर्षी एकदा वर्गात मुलांना विचारले, तुमच्यापैकी किती जण टीव्हीवरच्या मालिका पाहतात? वर्गातल्या निम्म्या मुलांनी हात वरती केले. मी प्रत्येक जण साधारण किती मालिका पाहतो, हे विचारल्यावर एका कन्येनं ती एकसलग पाच मालिका पाहात असल्याचं तिनं सांगितलं. मी तिला उद्यापासून कोणती तरी एकच मालिका पाहण्याची अट घातली आणि मग वर्षभर ती टीव्ही पाहण्यात किती वेळ वाया घालवते, याची चौकशी करीत राहिलो.

स्मार्टफोन हातात आल्यापासून फक्त तरुण पिढीचाच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांचा रात्रीचा कितीतरी वेळ मोबाईलवर टाईमपास करण्यात जातो, ही गोष्ट लक्षात आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना रात्री टाइमपास करायचा नाही, अशी अट स्वतःलाच घालण्याचा सल्ला दिला.

त्याचे कारणही मी त्यांना सविस्तर समजावून सांगितले. ते त्यांना क्षणात समजले. पटलेही. ते तुम्हालाही पटेल याची मला खात्री आहे.

मित्रांनो, रात्र वाईट... अंधार वाईट... तो वाईट गोष्टींना निमंत्रण देतो... असेच संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केलेले आहेत. स्मार्टफोनच्या निमित्ताने आपण सारे हे नव्याने अनुभवतो आहोत. म्हणजे पाहा, तुम्ही रात्री दहा वाजता मोबाईलवर एखादी वेबसिरीज किंवा एखादा मोठा सिनेमा पाहिला घेतलात किंवा युट्युब किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहत राहिलात, तर तासांमागून तास खर्च झाले तरी तुम्हाला त्याचे भान राहत नाही, असे तुमच्या लक्षात येईल. रात्री दहाला सुरु केलेली वेबसिरीज पहाटे चार पाच वाजेपर्यंत पाहणार्‍या तरुण मुलांची संख्या, आपल्या देशातसुद्धा लाखाच्या घरात असेल. निव्वळ टाईमपास म्हणून रात्री दोन-चार तास सहज खर्च करणार्‍या नागरिकांची संख्या काही कोटीच्या घरात असेल, हे सांगण्यासाठी सर्व्हे करण्याची आवश्यकता नाही.

गंमत आहे पाहा, समजा तुम्ही दिवसा पाच तास एखादी वेबसिरीज पाहत राहिलात किंवा दिवसाचे पाच तास तुम्ही युट्युबवर किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यात घालवलात किंवा एखादा ऑनलाईन गेम खेळण्यात घालविलात, एवढेच काय, पत्ते कुटण्यात, क्रिकेट खेळण्यात कॅरम खेळण्यात किंवा टीव्ही पाहण्यात जरी तुम्ही पाच तास खर्च केलात, तरी तुम्हाला त्याबद्दल अपराधीपणाची भावना वाटत.े रात्री मात्र खर्च केलेला वेळ आपल्याला अपराधाची भावना देत नाही. दिवस आणि रात्र यांच्यात हा एक मोठाच फरक आहे, जो आपल्या सहज लक्षात येत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला हा सल्ला, म्हणूनच आज मी आपणास, सर्व मित्रांना, ज्येष्ठांना आणि चिमुकल्यांनासुद्धा देतो आहे- रात्री टाईमपास करू नका.

हा एक सल्ला मानलात तर तुमचे कितीतरी मानवी तास तुम्ही वाचवू शकाल. आपले वाचणारे लाखो-करोडो मानवी तास आपल्या ही समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेतलात, म्हणजे हा सल्ला केवढा मोलाचा आहे, हे तुमच्या सहज लक्षात येईल.





सँडविच करायला शिका (421)




काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच.  अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या माध्यामातून शिकवण देणारा एक किस्सा कळाला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आमि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.

सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असते.

स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा हे सांगण्याचा माझा हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे माझ्या पदरचे नाही, पण मला भावलेले, मला विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवं, असं सतत वाटायला लावणारं आहे.

मी अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख मला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.

जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही असे वाटते. ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलात तर ती चूक ऐकणारालाही सुधारावी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही

ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही मला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा. अनेकदा आपण माणसांना आपण उगाच दुखावत असतो. अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या संडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.









विश्‍वासावर जग चालतं...(437)




आजकाल कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही, असे आपण वरचेवर म्हणत असतो. तरी विश्वास नावाचं मूल्य कितीतरी महत्त्वाचं आहे हे आपण जाणतोच. फसवणुकीच्या कितीतरी बातम्या आपण रोजच्या रोज वाचतअसतो. अशा वेळी मी तुम्हाला विश्‍वासावर जग चालते म्हटले तर तुम्हा मला वेड्यात काढाल. पण थांबा...

दोन छोट्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी काय सांगतो तेे सहज लक्षात येईल. एकदा एक विमान हवेत असताना त्यात बिघाड होतो आणि विमान वेगाने खाली येऊ लागते. तेव्हा सगळेच प्रवासी भयभित होतात. एक छोटी कन्या फक्त निर्भय असते. एक माणूस काळजीनं तिला विचारतो, तुला भीती वाटत नाही का... ती म्हणते, बिलकुल वाटत नाही. कारण या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत आणि मला विश्वास आहे की, ते हे विमान कोसळून देणार नाहीत.

दुसरी गोष्ट आहे सीमेवर लढत असलेल्या दोन सैनिकांची. बलवीर आणि दलवीर अशी त्यांची नावे. बलवीर जखमी होऊन पडला. दलवीर आपल्या सहकार्‍यांसह बलवीरपासून काहीशे फूट अंतरावर होता. बलवीर शेवटच्या घटका मोजत होता. पण त्याला वाटत होतं की, दलवीर आपल्याला भेटायला येईल.

दलवीरला सहकारी सांगत होते नको जाऊ, आता तो तसाही वाचणार नाही. पण सुसाट वेगाने येणार्‍या गोळ्या चुकवत दलवीर काही क्षणात त्या ठिकाणी पोहचला. बलवीरने त्याच्याकडे कृतार्थ नजरेनं पाहिलं आणि कायमचे डोळे मिटले. दलवीर येणार हा विश्वास सार्थ झाल्याने त्या शेवटच्या क्षणी बलबीरला जो आनंद झाला त्याला उपमा नाही. आणि आपण आपल्या मित्राच्या विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद दलवीरला आयुष्यभर ताकद देत राहिला.

मित्रांनो, विश्वासाची गोष्ट अशी आहे. आपण कितीही कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही असं म्हणत असलो तरी आपलं सगळं जीवन हे परस्परांच्या विश्वासावर अवलंबलेलं आहे.

थोडा विचार करून पाहा... तुमच्याही हे सहज लक्षात येईल.

आपण ज्या गाडीने प्रवास करतो, त्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण ओळखत नसतो, पण तो ड्रायव्हर गाडी नीट चालवेल याचा आपल्याला विश्वास असतो. आपण ज्या रस्त्याने चालत असतो त्या रस्त्याने हजारो वाहने जात असतात. त्यातला एकही ड्रायव्हर आपल्या अंगावर गाडी घालून आपल्याला चिरडून ठार मारणार नाही, हा विश्वास आपल्या मनात असतो, म्हणूनच आपण रस्त्यानं निर्धास्तपणे चालू शकतो. कोणत्या तरी इलेक्ट्रिशनने लावलेल्या पंख्याखाली आपण निर्धास्तपणे हवा घेऊ शकतो, कारण त्याच्या कामावर आपण विश्वास टाकलेला असतो. कोणत्याही हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण घेतो तेव्हा तिथल्या आचार्‍याने या अन्नात विष कालवलेलं नाही यावर आपला ठाम विश्वास असतो, नाही का... आपल्या एकूण जगण्यालाच विश्वासाचं अतिष्ठान लागतं.

जसं हे दुसर्‍यांच्या विश्वासावरचं आहे, तसंच अगदी आपल्या स्वतःवरच्या विश्वासाचं आहे. लोक मोठमोठे पराक्रम करतात ते त्यांच्यात शक्ती असते,  बुद्धी असते, म्हणूनच नव्ह,े तर असा काही पराक्रम आपण करू शकतो, असा विश्वास त्यांच्यापाशी असतो, म्हणूनच ते ती गोष्ट करू शकतात. प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल हा विश्वास असल्याशिवाय कोणताही खेळाडू मुळात मैदानावर उतरतच नाही. आपल्या जीवनाच्या मैदानावर आपण आयुष्य नावाची खेळ करीत असतो. तेव्हा आपल्याला जगता येईल, आपल्याला आनंदाने जगता येईल,  उत्तम जगता येईल, हा विश्वास आपल्यापाशी असायला हवा.

सावधानता हवीच, पण तरीही इतरांवर विश्वास ठेवायला. जग विश्वासावर चालतं.





गोष्टीची गरज (436)



गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावं... आजी गोष्ट सांग ना, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.

आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे

यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. तिला ओलाव्याचा अभाव असला तरी तिथे ती उपलब्ध आहे. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.

मुलांसाठी काम करीत असताना  ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.

गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असं नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍याचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात, असं वाटतं. आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. त्यांच्यातली एक कथाकथनकर्ती म्हणाली, भाषा जतन करण्याचा हा एक उत्तम मार्ग म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत.

खरं तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केलं तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्तानं आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजी-हिंदीच्या रेट्यखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

Monday, November 18, 2019

काही लेख

तुमचा मुलगा खेळतो काय? (17.11.2019)

आता चाळीशीत असलेल्या पिढीला बालपणाच्या ज्या आठवणी आठवतात, त्यातली एक आठवण सगळ्यांनाच आठवत असते. मैदानावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, लंगडी, हुतुतू असा कोणता तरी खेळ रंगात आला आहे आणि आपली आई आपल्याला ओरडून-ओरडून घरी बोलावते आहे. आपल्या मनात अजूनही खेळत राहण्याची इच्छा आहे आणि आई मात्र अरे पुरे झाले, तासनतास नुसते खेळत राहणार आहेस का, असे म्हणते आहे. आता मात्र घराघरात गेलात तर अरे पुरे झाले, किती तास खेळणार आहेस, हेच वाक्य आईच्या तोंडून पुन्हा-पुन्हा उच्चारले जात असल्याचे ऐकायला येईल. फरक एवढाच आहे की, आता हे वाक्य आई घरातच उच्चारते. घरातच मोबाईलवर तासन्-तास बसून खेळणार्‍या मुलाला उद्देशून. परवा एक आई मुलाला दम देऊन घराबाहेर खेळायला पाठवताना पाहिली आणि एकदम एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. मैदानावरून घरात न येणारी आमची पिढी आता इतिहासजमा झाली आहे आणि स्मार्टफोनच्या नादामुळे मैदानावरच न जाणारी एक नवी पिढी जन्माला आली आहे. वयाची तिशी पार करेपर्यंत मागच्या पिढीची पोटे खपाटीला गेलेली असत आणि आज सात-आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या पोटाला घड्या पडलेल्या दिसतात. त्या या बदललेल्या जीवनशैलीमुळे होय.
व्यायामाचे महत्त्व, शारीरिक हालचालीचे महत्त्व मागच्या पिढीला समजावून सांगावे लागले नाही. नव्या पिढीतील मुलांना मात्र, ‘अरे! किमान हला की रे’, असे सांगण्याची वेळ आली आहे. विशेषतः शहरांमध्ये जी गुबगुबीत बाळे आणि मुले दिसत आहेत. आरोग्यासाठी हे हितकर नाही. लहान मुलांनी व्यायाम करण्याची अपेक्षा नाही. त्यांचे शरीर लवचिक व्हावे आणि शरीरावर मेद साचू नये यासाठी त्यांनी खेळणे अपेक्षित आहे. मैदानी खेळांमधून आपसूकच जितका व्यायाम होतो, तेवढा मुलांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे मुले काटक आणि बळकट बनतात. मैदानावरील खेळ माणसाच्या शरीराला जसे ताजेपणा देतात तसेच माणसाचे मनसुद्धा ताजेतवाने करतात. मैदानी खेळामुळे मनोधैर्य वाढीस लागते,  चिकाटी निर्माण होते, खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि हे गुण मग पुढील आयुष्यात उपयोगी पडतात. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण यांना वाव मिळतो. त्यांचा विकास होतो. पुढील आयुष्यात त्याचा मोठा उपयोग होत असतो.
फार पूर्वीपासून मानव खेळ खेळत आलेला आहे. शिकार, कुस्ती, कवड्या, सोंगट्या, फासे, धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध असे नाना प्रकारचे खेळ जगाच्या पाठीवर माणूस वर्षानुवर्षे खेळत आलेला आहे. अलीकडच्या काळात एकूण जगाचे सपाटीकरण झाले आहे. त्यात आपण आपल्या कितीतरी गोष्टी हरवून बसलो आहोत. आज जगभरात स्मार्टफोनमुळे मोबाईल गेमचे प्रमाण इतके वाढले आहे की, मोबाईल गेमने जवळपास सगळ्या देशातले देशी खेळ संपवायला आणले आहेत की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे.
आधुनिक शिक्षणशास्त्रात खेळाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. खेळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात विशेष तासिका असतात. मात्र असे असले तरी आपल्याकडे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे या तासांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम भरून काढण्याकडे बहुतांश शाळांचा कल असतो. त्यात अलीकडेच शहरांमध्ये अनेक शाळांना मैदानेच नाहीत. त्यामुळे मैदानी खेळापासून मुले दुर्दैवाने दूर राहतात. अनेक सोसायट्यांनासुद्धा मैदाने नाहीत. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारात मैदानी खेळ खेळणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी मैदाने आहेत, पण दुर्दैवाने ती गाड्या पार्क करण्यासाठी वापरली जातात. परिणामी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होत नाहीत. विविध पातळ्यांवर खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. मात्र असे असतानाही एकूण समाजात मैदानी खेळाचे प्रमाण जितके असायला हवे तितके नाही.
आपल्याकडे क्रिकेटचे मोठे वेड आहे. मात्र हे वेड असलेले निम्म्याहून अधिक लोक कधीही क्रिकेट खेळत नाहीत. त्यांचे क्रिकेटवेड हे क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहणे आणि क्रिकेटविषयी बातम्या वाचणे इतक्यापुरतेच मर्यादित असते. दुसर्‍याचा खेळ पाहत राहण्यात फक्त मनोरंजन होऊ शकते. त्यातून शरीर आणि मनाला फार मोठा फायदा होत नसतो. क्रिकेट पाहणे हे मनोरंजनाचे साधन आहे. मात्र अलीकडे अनेकांच्या बाबतीत ते मनोरंजन राहण्यापेक्षा व्यसनच झालेले दिसते. क्रिकेटचे सामने सुरू झाले म्हणजे अनेक जण कामाला दांड्या मारून ते पाहात राहतात हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. याचाच परिणाम मुलांवर होत असतो.
एकूणच मैदानी खेळांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कालसुसंगत नाही. आपल्याला खेळांची केवढी आवश्यकता आहे हे आपण जाणले नाही. आपला मुलगा खेळतो काय, हे आपण पाहत नाही. त्यांनी खेळावे म्हणून आपण काही प्रयत्न करतोय, असे दिसत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे माणसाच्या मनावर प्रचंड ताण असतो. आपल्या मुलांना या नव्या युगात जगायला शिकवायचे असेल तर त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर केले पाहिजे. मैदानी खेळ हे मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. आजकाल आपल्या आहारातही फार मोठे बदल झाले आहेत. आपली नवी पिढी जंकफुडच्या आहारी गेलेली दिसते. एकदा तुम्ही मैदानी खेळ खेळायला लागलात, म्हणजे तुम्ही नकळतपणे आहाराविषयी दक्ष व्हायला लागता. आजही मैदानी खेळ खेळणार्‍या कोणत्याही खेळाडूकडे गेलात तर त्यांच्या आहारात जंकफूडचे प्रमाण फारच कमी असल्याचे तुमच्या सहज लक्षात येईल. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतो ही बाब खेळाडूंच्या मनावर नकळतपणे बिंबवली जात असते. जंकफुडमुळे होणारे अनेक आजार खेळाडूंपासून चार हात लांब राहतात हे वेगळे सांगायला नको.
मैदानी खेळांच्या याच विविध फायद्यांमुळे आपला मुलगा खेळतो काय? असा प्रश्न विचारावासा वाटतोपण त्याचे उत्तर नाही, असे असेल तर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.



‘सँडवीच’पद्धतीमुळे संबंध सुधारतील (16.11.2019)

काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना झेनगुरूंची अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच. एकाहून एक अफलातून झेनकथा आपल्याला अचंबित करून सोडतात. अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या उदाहरणातून एक महत्त्वाची शिकवण देणारा एक किस्सा कळला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आणि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.
सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही, त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम. स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा, हे सांगण्याचा इथे हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे आमच्या पदरचे नाही, पण आम्हाला भावलेले,  विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवे, असे सतत वाटायला लावणारे आहे.
आम्ही अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा आम्हाला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख आम्हाला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.
जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही, असे वाटते, ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलीत तर ती चूक ऐकणार्‍यालाही सुधारावीशी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही
ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही आम्हाला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा.
काही वेळेला स्पष्ट बोलावे लागते. शाळेत मुलांना रागावणे, कर्मचार्‍यांशी रागाने बोलणे हे ते काम साध्य करण्यासाठी आवश्यक तरी असते. पण अनेकदा नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांच्याशी बोलताना आपण उगाचच अयोग्य भाषा वापरतो. मग माणसे तुटतात. अनेकदा आपण माणसांना उगाचच दुखावत असतो, तर अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या सँडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.



प्राकृत मराठीमधील पहिला ग्रंथ (15.112019)

मराठी भाषेचा उगम प्राकृत मराठीमधून झाला. त्या प्राकृत मराठीमध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्‍तशती’ होय. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या चारशे वर्षांच्या काळात सातवाहन राजवट होऊन गेली. त्या राजांपैकी हाल सातवाहन राजाने ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध केला. राजा हाल सातवाहनाने आपल्या राज्यातील कवींना काव्यरचना करण्याचे आव्हान करून त्यांनी केलेल्या रचना संकलित केल्या. स्वत: काही रचना केल्या आणि त्यातून ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध झाला. ‘गाणे’ ह्या अर्थी असणार्‍या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील ‘आर्या’ ह्या वृत्तासारखे आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला ‘गाथासप्‍तशती’ हे नाव पडले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्‍तशती म्हणजे सातशे श्‍लोक. प्राकृत भाषेतील आद्यग्रंथ म्हणून या ग्रंथात उल्‍लेख केला जातो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या राज्याची राजधानी तेव्हा प्रतिष्ठान नावाने ओळखली जात होती. आजचे पैठण तेच त्यावेळचे
प्रतिष्ठान होय.
सातवाहन राजाने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेपर्यंत केला असल्याने त्याच्या गाथासप्‍तशतीचा उल्‍लेख उत्तर भारतातील अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. संस्कृत कवी बाणभट्ट व राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्‍तशती’चा उल्‍लेख केलेला आहे. या ग्रंथावर सुमारे 18 टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टिनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासाहस्त्री, संस्कृतमध्ये आर्यासप्‍तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत.
पाश्‍चात्य जर्मन पंडित वेबर यांच्यापर्यंत ‘गाथासप्‍तशती’ची महती पोहोचली होती. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर ह्या थोर जर्मन पंडिताने इ.स. 1881 मध्ये करून दिली. त्यानेच ह्या ‘गाथासप्‍तशती’ची (गाहा सत्तसई) पहिली संपादित प्रत तयार केली.
राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्‍लेख ‘गाथासप्‍तशती’मध्ये केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. ‘गाथासप्‍तशती’मध्ये दोन-दोन ओळींच्या सातशे गाथा संकलित केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील त्या काळचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि माणसामाणसांतील भावनांचा आविष्कार या गाथांमध्ये झालेला दिसतो. हाल सातवाहनाने या ग्रंथाचे संकलन आणि संपादन केलेले असल्याने काही अभ्यासक हाल राजाला महाराष्ट्रातील पहिला संपादक म्हणूनसुद्धा गौरवितात.
‘गाथासप्‍तशती’ या काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा परिसर चित्रीत झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील समाजजीवन, परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती आणि मराठी मातीचा गंध या गाथांमध्ये आढळतो. त्या काळच्या समृद्ध ग्रामजीवनाचे चित्रण या गाथांमधून येते. साळी, तूर, कापूस, ताग, हळद इत्यादी पिके, आंबे, जांभूळ, काकडी ही फळे झाडे, पशुपक्षी शिवाय गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्यांचे उल्‍लेखही ‘गाथासप्‍तशती’मधील अनेक ग्रंथांमध्ये आढळतात.
‘गाथासप्‍तशती’मध्ये ज्या सातशे गाथा आहेत त्या दोन ओळींच्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचना आहेत. मानवी भावना, मानवी व्यवहार आणि नैसर्गिक दृश्यांचे सुंदर आणि सौंदयपूर्ण चित्रण या गाथांमध्ये केलेले आढळते. स्त्री-पुरुष यांच्यामधील विलासपूर्ण व्यवहार, प्रणय यांचाही विलोभनीय आविष्कार ग्रंथात मोकळेपणाने केलेला आढळतो. विविध व्रते आढळतात. होळीसारख्या उत्सवांचे उल्‍लेख आढळतात.
आज उपलब्ध असलेल्या ‘गाथासप्‍तशती’चे सहा पाठभेद असल्याचे सांगतात. यातल्या काही कथांमध्ये हजार गाथा आहेत, तर त्यातील 430 गाथा या सगळ्या पाठभेदांमध्ये असल्याचे एका अभ्यासकाने म्हटले आहे. काही अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, हाल सातवाहनाने सुंदर सुभाषितांचा एक कोश निर्माण केला, त्यातच पुढे सातशे गाथांचा समावेश झाला आणि त्याचे नाव ‘गाथासप्‍तशती’ असे झाले.
तत्कालीन समाजात आढळणार्‍या स्त्रियांविषयी यातल्या अनेक गाथा आहेत. अनेक गाथा या शृंगाररसप्रधान आहेत. स्त्रीची साध्वी, पतिव्रता, चंचला, कुलटा अशी विविध रूपे या गाथांमधून वर्णन केलेली आहेत.
मराठीतील एक नामवंत कवी राजा बढे यांनी ‘शेफालिका’ नावाने या ग्रंथाचा मराठीत पद्यानुवाद केला आहे. याच पुस्तकात प्रा. अरविंद मंगरूळकर यांनी गद्यानुवाद केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


हसायला विसरू नका! (12.11.2019)


‘हसतो तो माणूस’ अशी एक माणसाची व्याख्या आहे. माणूस आनंद झाला म्हणजे हसतो. तो विनोद वाचून हसतो. नाटक-सिनेमा पाहून हसतो. टीव्हीवर कार्यक्रम पाहून हसतो आणि एकमेकांशी बोलताना गंमत करून हसतो. कोणी ओळखीचा दिसला तरी हसतो, कोणी ओळखीचा नसेल तर ओळख काढायला म्हणून हसतो. हसण्यात आनंद आहे. सुख आहे. मन ताजेतवाने करण्याची शक्ती आहे. आजारांपासून बचाव करण्याची शक्तीही या हसण्याच्या आनंदात आहे.
माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली, पण आनंदाने जगायचे कसे, याचे उत्तर मात्र विज्ञानतंत्रज्ञानाला देता आलेले नाही. विज्ञानाने सुखसाधने तयार केली, पण सुख निर्माण कसे करायचे हे मात्र विज्ञानाला कळलेले नाही. माणसाने सुख शोधल पाहिजे. त्यासाठी आला क्षण जगून घेऊन हसले पाहिजे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्येे 156 देशांची क्रमवारी लावली आहे. कोणता देश किती आनंदी आहे यावर ही क्रमवारी ठरते. या क्रमवारीत यंदा भारत 7 अंक मागे गेला असून यंदा 140 व्या क्रमांकावर आहे.
अनेक गोष्टीमध्ये पहिल्या पाचदहामध्ये असणारा देश आनंदाच्या क्रमवारीत पहिल्या शंभरातसुद्धा असू नये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्थळकालपरिस्थिती यास कारणीभूत  आहे हे खरेच. पण महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या देशात आनंदाने कसे जगावे हेच आता आपल्या माणसांना सांगायची वेळ आली आहे, हे दुर्दैव होय. देशांचा हा आनंदाचा क्रम त्या देशातील नागरिक किती आनंद घेऊ शकतात, यावर अवलंबून असतो. अंतिमता माणसाचे जगणे किती आनंदी आहे हेच महत्त्वाचे, नाही का?
काही काही माणसे सदैव दुर्मुखलेली असतात. ती तशी का असतात कळत नाही. दुःख आणि संकटे तर प्रत्येकाच्याच जीवनात असतात. ती जीवनाची अपरिहार्यता आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे. तेव्हा जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक असणार हे तर आहेच. पण म्हणून सदासर्वदा चेहरा पाडून बसून
कसे चालेल?
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. एक भिकारी एका साधूकडे भीक मागत असतो. साधू म्हणतो, प्रथम तू मला काहीतरी दे. मग मी तुला काहीतरी देईन. त्यावर आश्चर्यचकित झालेला भिकारी म्हणतो, साधुमहाराज, माझी थट्टा करता काय? माझ्याकडे आहे काय तुम्हाला द्यायला? त्यावर तो तेजस्वी साधू उत्तर देतो, ईश्वराने तुला हसण्याचे सामर्थ्य दिले आहे आणि ते आजही तुझ्यापाशी आहे.
खरे तर भीक मागणार्‍या माणसाकडून गोड हसण्याची अपेक्षा करता येणार नाही किंवा चेहरा पाडल्याशिवाय भीक मिळणार नाही हेही खरे, पण त्या सवयीने भिकारी आपल्याला हसता येते हेच विसरून जातो. हे फक्त भिकार्‍याचेच होते असे नाही. चांगल्या चांगल्या घरातली कमावती माणसेही असे वागू लागतात. माणसाने दुसर्‍यासाठी हसले पाहिजे आणि स्वतःसाठीही हसले पाहिजे.  हसणे ही फक्त माणसाला लाभलेली देणगी आहे. तेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण आपण तेच विसरून चाललो आहोत. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे संतांनी लिहून ठेवले आहे. हास्य हे मन प्रसन्न करण्याचे सर्वोत्तम टॉनिक आहे. अनोळखी माणसालाही तुम्ही एक स्मितहास्य करून दाखवलं तर तो त्या क्षणापुरता का होईना तुमचा होऊन राहतो. मग आपली माणसं अधिक जवळ येतील यात शंका आहे का?
हास्याचे नाना प्रकार आहेत. त्यातलं निर्मळ हास्य हेच सर्वोत्तम हास्य होय. विकट हास्य, कुत्सित  हास्य अशा काही हास्यापासून मात्र आपण स्वतःला सदैव दूर ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा माणसाने हसले पाहिजे. नाहीतर माणसाचं हसू होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे किंवा हसते हसते जीना सिखो अशी वचने ऐकणार्‍या आपल्या समाजाला हसायचे कसे हे सांगायला लागू नये. आपल्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यातला पुनर्जन्म विचार  हा माणसाच्या सुखासाठी जन्माला आलेला आहे, नाही का? म्हणून आम्हा म्हणतो, माणसा,
हसायला विसरू नको!

Thursday, August 15, 2019

लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत

शांतिप्रिय लडाखला वेगळे झाल्याचा आनंद
70 वर्षांचे स्वप्न साकार झाले!
लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत
(वैभव बळीराम चाळके)
आपल्याला माहीत असलेला लडाख म्हणजे उंचच उंच ओसाड डोंगररांगा... भारतातलं पर्यटनाचं एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे लडाख! विशेषत: मोटर सायकलवरून ट्रेकिंग करण्याची हौस असणार्‍या लोकांचे ड्रिम डेस्टिनेशन म्हणजे लडाखच्या ओसाड पण नयनरम्य डोंगररांगा होत. अप्रतिम दृश्यांनी ओतप्रोत भरलेल्या या डोंगररांगांमध्ये दरवर्षी पर्यटक गर्दी करतात. आता जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष राज्याचा दर्जा म्हणजे कलम 370 हटवल्यामुळे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश असे विभाजन  केल्यामुळे लडाखमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांपेक्षा वेगळे असलेले हे लोक कायम त्या राज्यात उपेक्षित राहिले. म्हणून त्यांनी गेली अनेक दशके, स्वातंत्र्यापासूनच लडाखला केंद्रशासित प्रदेश करावे म्हणून मागणी लावून धरली होती. काश्मीरच्या विभाजनामुळे, जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन प्रदेश केंद्रशासित जाहीर केल्यामुळे या लढ्याची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लडाखच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. डोंगररांगात वसलेल्या या लोकांची जम्मू-काश्मीरने कायमच उपेक्षा केल्यामुळे आता केंद्राकडे जाऊन आपले जीवन अधिक लवकर, अधिक सुकर करता यईल, असे लडाखला वाटते आहे. लडाखला जम्मू काश्मीरपासून अलग करा, अशी मागणी करत 70 वर्षे लढा देणार्‍या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांच्याशी आम्ही साधलेला हा संवाद...
लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले, या घटनेकडे आपण कसे पाहता?
रिनचेन नामग्याल- आम्ही अत्यंत खूश आहोत. आम्हा सगळ्यांनाच मोठा आनंद झाला आहे. आम्ही या आनंदाचा उल्लेख दुसरे स्वातंत्र्य असा करीत आहोत. 70 वर्षे म्हणजे स्वातंत्र्यापासून आमची ही मागणी होती. आमचे हे स्वप्न होते. ते आज अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आमच्या प्रदेशातील सगळी जनताच आज खूप आनंदात आहे. आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आपण गेली अनेक वर्षे जम्मू आणि काश्मीरपासून अलग होण्यासाठी लढा उभारला होता. जम्मू-काश्मीरपासून अलग व्हावे, असे आपल्याला का वाटत होते?
रिनचेन नामग्याल- 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच आमची ही मागणी आहे. 1947 सालीच आमच्या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे एक पथक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना जाऊन भेटले होते आणि तेव्हाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती. त्या वेळीच, आम्हाला केंद्रशासित प्रदेश करणे शक्य नसल्यास हिमाचलप्रदेशला जोडून द्या, अशीही मागणी केली होती. म्हणजे आम्हाला जम्मू-काश्मीरसोबत राहायचे नव्हते. आम्हाला स्वतंत्र किंवा हिमाचलप्रदेशसोबत राहणे चालणार होते. याला अनेक कारणे आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील लोक आणि लडाखमधील लोक यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांचे राहणीमान आणि आमचे राहणीमान याच्यात कोणताही मेळ नाही. आमची भाषा त्यांच्या भाषेहून वेगळी आहे. तरीही एवढी वर्षे आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. लडाखमधील लोक हे शांतिप्रिय लोक आहेत. काश्मीरमध्ये सततची अशांतता आढळते. त्याचा प्रभाव सतत आमच्यावर पडत होता. तो त्रास आम्हाला सहन करावा लागत होता. काश्मीर प्रदेशात कोणतीही घटना घडली की, त्याचा थेट परिणाम आमच्यावर होत होता. कॉलेजची तीन वर्षे पूर्ण करण्यासाठी आम्हाला काश्मीरमधील अस्थिरतेमुळे पाच-सहा वर्षे लागत होती. कारण काश्मीरमध्ये अस्थिरता आली की, कॉलेज बंद होत आणि मग त्याचा परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर होत होता. परीक्षा पुढे ढकलल्या जात होत्या. निकाल वेळेवर लागत नव्हते. असे अनेक प्रश्न काश्मीरमधील अस्थिरतेमुळे आम्हाला अडचणीत टाकत होते. काश्मीर हा मुस्लीमबहुल भाग आहे आणि लडाखमध्ये बुद्धिस्टांची संख्या अधिक आहे. जम्मू-काश्मीर राज्याने आम्हाला सततच दुय्यम वागणूक दिली. विविध विकास कामांसाठी पैशांच्या मंजुरीपासून अन्य अनेक बाबतीत आम्ही कायम डावलले गेलो. त्यामुळे आमच्यामध्ये वेगळे होण्याची भावना उत्तरोत्तर दृढ होत गेली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि देशविघातक शक्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. लडाखमध्ये मात्र तसे आढळत नाही. लडाखमधील लोक हे राष्ट्रवादी आहेत. त्यांनी अनेक लढायांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आमच्या अनेक संस्था, विशेषत: आमच्या युवा संस्था या कारगिलसारख्या अनेक युद्धाच्या वेळी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करीत होत्या. आपल्या जवानांसाठी अन्नपुरवठा करण्यापासून अन्य अनेक प्रकारची मदत करण्यास लडाखचे लोक कायमच आघाडीवर होते. महिला संघटनांनी हे काम नेहमीच हिरिरीने केले. त्यामुळे लडाख जम्मू-काश्मीरपासून तोडून वेगळा केंद्रशासित प्रदेश केला हे आमच्यासाठी खूप चांगले झाले आहे. आमचे एक सगळ्यात मोठे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
आपली राजकीय आकांक्षा तर पूर्ण झाली, पण लडाखमध्ये आता आणखी कोणकोणत्या समस्या आहेत
रिनचेन नामग्याल- आमची स्थानिक भाषा बोथी(बोधी म्हणूनही ओळखतात.) ती या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे. हिमाचलप्रदेश, सिक्कीम डोंगररांगांपासून थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत आमची ही भाषा बोलली जाते. त्यामुळे आमच्या या भाषेला केंद्रांच्या चौतीस भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, अशी आमची इच्छा आहे.
आपल्याला जम्मू काश्मीर विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही...
रिनचेन नामग्याल- जम्मू-काश्मीर राज्याचा 70 टक्के भूभाग लडाखमध्ये आहे. मात्र आमची लोकसंख्या केवळ तीन लाख इतकी आहे. म्हणजे एकूण राज्याचा विचार करता ती अगदीच नगण्य आहे. आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आहोत. जम्मू-काश्मीर विधानसभेत सर्व मिळून आमचे केवळ चार आमदार आहेत. केंद्रात एक खासदार आहे. लडाखमधील एकूण लोकसंख्येपैकी 56 टक्के लोक हे बुद्धिस्ट समाजाचे आहेत. या प्रदेशाकडे राज्याने सतत दुर्लक्ष केले हे मी आधी सांगितले आहेच. या सर्व कारणांमुळे आमच्याकडे लडाख वेगळा करण्याची मागणी कायमच करण्यात येत होती.
लडाख हा प्रदेश पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र परिचित आहे, पण याव्यतिरिक्त तुमच्याकडे कोणते उद्योग चालतात? लडाखची माणसे अर्थार्जनासाठी काय करतात?
रिनचेन नामग्याल- पर्यटन हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय आमच्याकडे लोक स्वतःपुरती शेती करतात. अनेक लोक सरकारी नोकर्‍यांमध्ये आहेत. आर्मीमध्ये भरती होणार्‍यांचे प्रमाण आमच्याकडे फारच मोठे आहेत. प्रत्येक घरात किमान एक माणूस सैन्यात असलेला आढळेल. सैन्यात ज्या घरातला माणूस नाही, असे घर लडाखमध्ये तुम्हाला क्वचितच आढळेल. त्यातूनच आमचा चरितार्थ चालतो.
सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा आपण जम्मू-काश्मीरपेक्षा वेगळे आहात त्याबद्दल काय सांगाल...
रिनचेन नामग्याल- आमच्याकडे मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आमचे लोक अतिशय संवेदनशील आहेत. शांतिप्रिय आहेत. शेजारी जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता असताना आमच्याकडे मात्र कायमच शांतता असलेली आढळते. समाजामध्ये एकजिनसीपणा आढळतो. आतापर्यंत आमच्याकडे समाजात मोठे तेढ कधीच निर्माण झाले नाही. लडाखमध्ये लोकांनी काहीतरी आगळीक केली आहे असे तुम्हाला आढळणार नाही. लडाखच्या लोकांमध्ये भारताबद्दल प्रेम आहे. भारतीय आर्मीबद्दल आस्था आहे. जेव्हा जेव्हा भारतीय जवानांना गरज पडली, तेव्हा तेव्हा लडाखी लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना मदत करत आले आहेत. प्रत्येक युद्धाच्यावेळी लडाखी लोक सैन्याच्या पाठीशी उभे
राहिले आहेत.
11-8-2019

Wednesday, August 7, 2019

मन मिटण्याचा दुःख..

मन मिटण्याचे दुःख...
कागदाची करामत या कार्यक्रमात ज्या विविध गोष्टी मी समाविष्ट केल्या आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे मुलांना या जगात कोणीही ढ नसतो हे सांगणे.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत जो माणूस अभ्यासात हुशार, तो हुशार, असे एक धारणा असलेली दिसते. एक विनोद या अनुषंगाने मला आठवतो. एका विद्यार्थ्याने एकदा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारला होता, सर, कमल अभ्यासात हुशार आहे आणि विमल ढ हे खरेच. पण परवा नदी ओलांडताना कमल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, तेव्हा विमलने तिला पाठीवर मारून किनाऱ्यावर आणली. तरीही आपण सगळे कमलला हुशार म्हणतो. हे कधीतरी बदलेल का हो...
तुम्ही आता आपल्या वर्गातल्या मुलांकडे पाहाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, वर्गात पहिल्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात यशस्वी झालेली नसतात आणि शेवटच्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात अयशस्वी झालेली नसतात. कारण प्रत्येकाचे हुशारीचे एक क्षेत्र असते. माणूस हुशार असेल असे एक तरी क्षेत्र असते. एक माणूस सगळ्याच विषयात हुशार नसतो. तसेच वर्गात कोणीही सर्वात ढ नसतो. असलाच तर तो विशिष्ट विषयाच्या अभ्यासात ढ असतो. किंवा आपल्या एका शैक्षणिक पद्धतीत ढ असतो. म्हणून त्याला सगळ्या जीवनातून बाद करण्याची आपली जी व्यवस्था आहे, ती फारशी चांगली नाही. हेच मुलांना सांगण्यासाठी मी जिथे कुठे कार्यक्रम करतो, तिथे मुलांना प्रश्न विचारत असतो. आपल्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे रे... कदाचित एखादा हात वरती येतो. मग मी दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या सगळ्यात ढ कोण आहे रे...
मी आजवर जितके कार्यक्रम केले, त्या कार्यक्रमात कोणीही हात वरती केलेला नाही. कारण सगळ्यात ढ असा कोणीच नसतो. किंवा आपण आहोत असं कोणालाही वाटत नसतं.
याही कार्यक्रम कोणी हात वरती करणार नाही हे मला माहीत होते. मुले एकमेकांकडे पाहत होती. एकदुसऱ्याची नावे सुचवत होती.
पण एका क्षणी माझा आत्मविश्वास गळून पडला. एक मुलगी हात वरती करून, मी आहे, म्हणाली. मला क्षणभर काय बोलावं कळेना. असा अनुभव मला माझ्या कार्यक्रमात यापूर्वी कधीच आला नव्हता. मी तिच्या जवळ गेलो. तिला विचारलं, हे तुला कोणी सांगितलं... तर ढसाढसा रडत म्हणाली, आहेच मी... सगळ्यांनाच माहीत आहे...
मला तिचा केविलवाणा चेहरा पाहवेना. तिच्याशी काय बोलावं ते कळेना... पण मी एक दीर्घ श्वास घेतला. तिला म्हटलं, ऊठ, इकडे ये, जगात सगळ्यात ढ असे कोणीच नसते.
मग मी सगळ्या मुलांकडे पाहत म्हटलं, मी तुम्हाला सहज करता येणारा एक एन्व्होलोप शिकवणार आहे. कात्रीच्या वापराशिवाय, फेविकॉल, डिंक, गम यांच्याशिवाय बनवता येणारा... एखाद्या लग्नात गेलात तर प्रेझेंट देता येणारा... एखाद्याच्या वाढदिवसाला प्रझेंट म्हणून पैसे द्यायचे असतील तर ते घालून देता येतील अशा... एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर त्यासाठी वापरता येणारा...
पुढच्या पाच मिनिटांत मी मुलांना दाखवत तो एन्व्होलोप बनविला. त्या कन्येलाही बनवायला सांगितला. त्या मुलीने मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकली आणि केली होती. कारण आता ती ढ उरली नव्हती. ती सगळ्यांच्या समोर होती. आताची सेलिब्रिटी होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. म्हणूनच असेल कदाचित मी बनवलेल्या एन्व्होलोपपेक्षा तिने उत्तम एन्व्होलोप बनवला होता. तो सगळ्यांना दाखवत मी म्हणालो, मित्रांनो, हिला आतापर्यंत असं वाटत होतं की ती सगळ्यात ढ मुलगी आहे, पण मला सांगा इतका सुंदर एन्व्होलोप बनवणारी मुलगी ढ कशी असेल. हे पाहा, मी जो बनवला आहे त्याहून अधिक नीट तिने बनवलाय.
मग तिला म्हटलं, गैरसमज काढून टाक. तू ढ नाहीस.
कार्यक्रम संपल्यावर मी त्या मुलीला म्हटलं, राहतेस कोठे...
ती म्हणाली, इथेच. मागच्या रोडवर. फुटपाथला.
मी पुन्हा निशब्द... काही क्षण काय बोलावं खलेना... मी माझ्या जवळ असलेले काही कागद त्या मुलीला देत शाळेचा निरोप घेतला.

जगात सर्वात ढ कोणी नसतो, ह्या मतावर मी आजही कायम आहे. पण असं लखलखीत खरं बोलणारे लोकही आहेत, हेही आता मला अनुभवाने पटलं आहे.

आता कोणत्याही क्षणी त्या प्रसंगाची आठवण येते. मनात कालवाकालव होते. मग मन मिटून मी दुसऱ्या कामाला लागतो. मन मिटण्याचा दुःख केवढं मोठं आहे, ते असं थोडी शब्दांत सांगता येतं?

Friday, July 5, 2019

स्टेशनच्या बाहेर बससाठी उभा होतो. बसस्टॉपवर पंधरा सोळा वर्षांचा तरुण उभा होता. तिथे आलेल्या एका नशेबाज चरशी इसमाने त्याची खोड काढली. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
मी मुलाला म्हटले, तू शांत राहा. त्याला जाऊ दे.
तो चरशी निघून गेल्यावर याला म्हटले, त्याला तर कशानेच काही फरक पडणार नाही. तू चांगला आहेस. तुला तुझ्या करिअरची काळजी आहे. तेव्हा तूच समजदारपणा दाखवणं अपेक्षित आहे.

चिखलात दगड मारू नये, असे जाणते लोक म्हणत, त्याची आठवण आली.