मराठी गझलक्षेत्रात बेसुमारांची सद्दी...
नव्वदच्या दशकात मी कॉलेजात प्रवेश केला तेव्हा चारोळ्यांचे युग सुरू होते. चंद्रशेखर गोखले यांचा मी माझा हा चारोळी संग्रह प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे कविता लिहू पाहणारा प्रत्येक जण चारोळी लिहून पाहत होता. म्हणूनच कदाचित कविता लिहिणार्या मला माझे मित्र तू चारोळी संग्रह का काढत नाहीस, अशी विचारणा करीत असत.
मला आठवतं मी अशा मित्राला म्हणत असे, तुला पैसे वरती आले असतील तर सांग. सध्या बाजारात ज्या लायकीचे चारोळी संग्रह येत आहेत, त्या लायकीचा चारोळीसंग्रह एका रात्रीत लिहून देईन.
पुढे चारोळीसंग्रहाचा मोसम कमी कमी होत संपून गेला. पण मला आठवते, या चारोळ्यांनी चंद्रशेखर गोखलेना जी अमाप प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धीच्या मागे मराठीतले मोठमोठे कवी लाल गालत धावले होते. एका मोठ्या कवयित्रीने लिहिलेला चारोळीसंग्रह हाती आला तेव्हा त्यावरचा अभिप्राय मी पुढीलप्रमाणे दिला होता...
चारोळी लिहून तिने
प्रसिद्धी मिळवली
प्रसिद्धी मिळवली
आणि प्रतिष्ठा गमावली...
हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे बरोबर पंधरा-वीस वर्षांनी आज गझलसंग्रहाचे तसेच पीक आले आहे.
आज एका जेष्ठ गझलकाराशी बोलत असताना मी या पिकाला काँग्रेसच्या गवतासारखे अशी उपमा दिली आणि माझी मलाच गंमत वाटली. काँग्रेसचे गवत किती अमाप उगवते आणि किती निरुपयोगी असते हे आपणा सगळ्यांना माहीत असेलच. आज त्या काँग्रेसवरसुद्धा श्लेष निर्माण झाला आहे. आज मराठीमध्ये गझललेखन करणारे शेकड्याच्या संख्येत आहेत. कोणे एके काळी पुण्याच्या या एका लेखकाने मराठी साहित्यावर सुमाराची सद्दी असा एक लेख लिहिला होता. आजच्या गझललेखनाकडे पाहिले म्हणजे बेसुमाराची सद्दी असा लेख लिहावा वाटेल.
मी गजलचा अभ्यासक नाही. अलीकडच्या गझललेखनाचे माझे दांडगे वाचन नाही. तरीही गेल्या या आठ-नऊशे वर्षांच्या मराठी कवितेचा रसिक म्हणून मी मराठीतील अनेक गझलकाराच्या गजला वाचत आलेलो आहे. अनेक गझलसंग्रहही वाचले आहेत. म्हणूनच कदाचित हे असे विधान करण्यापर्यंत मी येऊन ठेपलो आहे. मराठी गझलच्या क्षेत्रात अनेक लोक आले ही वाईट गोष्ट नाही. मात्र गझलचे तंत्र अवगत करताना त्यात आशय दोनच ओळी संपवायचा असतो, हीच गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली गेली. किंवा या सवलतीचा फायदा घेतलेला दिसतो. एका बाजूला गझलबद्दल असलेली समाजाची आवड... तिला मिळणारी प्रतिष्ठा... याचा मोह अनेकांना पडला आणि दुसऱ्या बाजूला छंदोबद्ध कविता लेखनाचा आवाका नसलेले लोक मग गजलेच्या दोनच ओळीच्या आशयाच्या झेपेकडे आकृष्ट झाले. त्यांनी सुमार शेराचे बेसुमार पीक काढले.
हे असे पीक आले याचे दुःख नाही. दुःख या गोष्टीचे आहे की जेव्हा असे काँग्रेस गवत बेसुमार वाढू लागते, तेव्हा परिसरातील दूर्वा दिसेनाशा होतात. समाज जिवंत ठेवायचा असेल... रसरशीत ठेवायचा असेल.... तर त्याला दूर्वांची नितांत गरज असते. त्या फार नको असतात. एकवीस दुर्वांची जुडी पुरत असते. मात्र काँग्रेस गवताच्या अमाप पिकात 21 दुर्वा हरवून जातात. त्या हरवून जाण्याचे दुःखच रसिकमनाला अहोरात्र टोचते आहे...
- वैभव बळीराम चाळके
9702723652

No comments:
Post a Comment