अजब न्याय
काय करतो आहेस?
वैजयंतीने फोनवर बोलणं या प्रश्नातच सुरू केलं.
उद्याचं पान लावतोय.. मी तिला म्हणालो.
मी तेव्हा उद्या प्रकाशित होणारे युवा पान सेट करीत होतो.
कधी निघणार आहेस? तिने दुसरा प्रश्न विचारला.
पान झालं की... मी म्हणालो.
किती वेळ लागेल..? तिने प्रतिप्रश्न केला.

तासभर तरी जाईल... मी स्पष्टीकरण दिलं.
आज भेटशील..? तिने विचारलं
हो... म्हणालो.
मग भेटूया.. मी वाट पाहते... असं म्हणून ती फोन ठेवायला निघाली, तर मीच विचारलं,
काही अर्जंट आहे का?
तसंच समज... बोलायचंय तुझ्याशी.. ती म्हणाली.
येतो...
ठेवू... ?
मी बाय-बाय म्हणालो आणि आणि फोन कट केला.
पण 'काय प्रॉब्लेम असेल'च्या भुंग्याने मन पोखरायला सुरुवात केली. पानाचा लेआउट करण्यात मनच लागेना. ऑपरेटर सोलकरला सूचना दिल्या आणि पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसबाहेर पडलो.
नेहमीच्या जागी पोहोचलो. वैजयंती अगोदरच पोचली होती. मोबाईलवर फेसबुकशी चाळे करीत माझी वाट पाहत बसली होती. नेहमी हसतमुख असणारी ही बया तोंड पाडून बसली होती. काय झालं म्हणून मी विचारलं तर काही न बोलता घडाघडा रडायलाच लागली.
बाजूला बसून उजवा हात पाठीमागून तिच्या उजव्या खांद्यावर टाकून मी तिला नेहमीप्रमाणे जवळ घेतलं आणि विचारलं,

काय झालं?
तर प्रश्नाचे उत्तर आले नाही. हुंदके
ऐकायला येऊ लागले.
डाव्या हातानं प्रथम हनुवटी उचलून मग मी तिचे डोळे पुसले.

आश्वासक स्वरात पुन्हा विचारलं,
काय झालं?
मग मात्र तिने आढेवेढे न घेता रडवेल्या
चेहऱ्याने सगळी गोष्ट सांगितली.
गोष्ट एकदम फालतू होती.
तिची सहकारी कोणी माया का छाया म्हणून... तिला बॉसने कामावरून काढून टाकलं. तिच्या घरी पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. ती जाताना तिच्याजवळ रडली. त्या रडण्याचं हिला वाईट वाटलं. म्हणून आता ही हुंदके देत होती. मी म्हटलं, तुला वाईट वाटलं तर ठीक आहे. पण मेली तर नाही ना... जिवंत आहे ना... मग सोड चिंता. मिळेल दुसरा जॉब. मग जरा अस्वस्थ होत तिने आपला हॅंकी बाहेर काढून तोंड पुसलं. तिला हसवण्यासाठी ‘हॅंकी...’ म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हॅंकीचा शॉर्टफॉर्म तिच्या पहिल्या भेटीत कळला. ती जेव्हा हातरुमालाला हॅंकी म्हणाली तेव्हा मी म्हटलं होतं की, शब्द एकदम परफेक्ट आहे. हॅकरचिप एवढा मोठा शब्द म्हणण्याइतका एफएसआय तरी आहे कुठे त्यावर?

तिला तेव्हा एफएसआय हा शब्द माहीत
नव्हता. तो सांगितल्यावर तिला हसू आलं होतं. आज मात्र तिला हँकी म्हटलं की तो
विनोद आठवण हसू येतं.
प्रेमात असलं की छोट्या छोट्या गोष्टी
एवढ्या सुंदर दिसू लागतात.
आम्ही उठलो. नेहमीच्याच चहावाल्याकडे गेलो. मी चहा पीत नाही. ती नेहमीप्रमाणे फूल चहा प्यायली. चहावाल्याशेजारी पानपट्टी आहे त्याच्याकडून चॉकलेट घेतली. एक फोडून तोंडात टाकलं. खिश्यातून फोन काढला आणि ऑपरेटर सावपेकरला फोन केला.
झालं का रे पान? मी विचारलं तर तो म्हणाला, हो.
ठेवतो मग. गुड नाईट. मी म्हणालो आणि फोन कट केला.
सालपेकर आमच्या डिपारमेंटमधला सर्वात सीनियर माणूस. तितकाच सिन्सियर. म्हणूनच तर मी सालपेकरवर पान सोडून बाहेर पडू शकतो.
वैजयंतीला तिच्या गाडीला सोडून मी माझ्या घरची वाट धरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंथरुणात असतानाच फोन वाजला. उपसंपादक मानेचा फोन होता. मी झटकन फोन उचलून कानाला लावला आणि हॅलो म्हणालो. तो हॅलो न म्हणता म्हणाला, साल्या, वाट लावलीस ना... काल काय झोपला होतास काय पान लावताना? क्षणात माझी झोप उडाली. उठून बसत मी काळजीच्या स्वरात विचारलं, काय झालं?
झालेलं काही नाही. तू केलं आहेस ते सांगायला फोन केला.
अरे काय झालं ते नीट सांग ना... मी करवादलो.
काय लफडा करून ठेवला आहेस पानावर? त्याने प्रश्न घातला.
काय झाले ते सरळ सांग ना भडव्या... मी त्याला शिवी घातली.
वाघ्रप्रकल्पाच्या लेखात वाघवाघिणीच्या मैथुनाचा फोटो का टाकला आहेस?
काय? मी आश्चर्याने उद्गारलो. तो काहीच बोलला नाही.
सालपेकरने वाट लावली माझी यार... मी म्हणालो.
तो त्यावरही काही बोलला नाही. मग मीच म्हणालो, खरं सांगतो आहेस ना?
सरांनी दाखवलं मला... आल्याआल्या ते म्हणाले... तोच वाघ तुझ्यावर चढवतो.
म्हणाले, मालकाचा सकाळी सहाला फोन आला होता त्यांना...
मी त्यावर काहीच बोललो नाही. मग तोच म्हणाला, पण पुन्हा पाच मिनिटांनी सर मला म्हणाले, कळवा त्याला आणि टेन्शन घेऊ नको म्हणावं. आल्यावर बघू.
खर?
खरं!
होय... पण लक्षात ठेव चूक गंभीर आहे.

निघतो मी ताबडतोब, मी म्हणालो
बाय म्हणत त्याने फोन ठेवला.
बाय म्हणत त्याने फोन ठेवला.
मानेचा फोन ठेवला आणि मी वाघ मागे
लागल्यासारखा तयारीला लागलो.
मी ऑफिसात पोहोचलो
तेव्हा माने कामासाठी बाहेर गेला होता. सरळ सरांच्या केबिनमध्ये शिरलो. सॉरी
म्हणालो आणि सगळं खरं खरं सांगितलं, मैत्रिणीला भेटायला गेलो. उठल्यावर सरांनी
तिचं नाव विचारलं. मी तेही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. थोडे वैतागले, पण मग
म्हणाले, आता तू विषय सोड उद्याच्या कामाला लाग.
थँक्यू सर, म्हणून
मी निघालो तर मागून सरांचा आवाज आलास, आणि हो त्या सालपेकरला शिव्या घालू नकोस.
नाही सर, मी
म्हणालो.
मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि डीटीपी विभागात गेलो. सालपेकर तोंड पाडून माझ्याजवळ आला. म्हणाला, माफ करा सर, माझ्या लक्षातच आलं नाही. काल खूप काम होतं. चारच्या बातम्या बदलायचे होत्या. घाईत लक्षातच आलं नाही. मी पानावर घेतला तेव्हा तो फोटो छोटा होता. त्यामुळे असं काही असेल हे लक्षातच आलं नाही. मी घरी गेल्यावर उशिरा त्या आर्टिकलच्या बाजूची बातमी काढण्याचा आदेश आला, म्हणून नावकरने जागा भरायला फोटो वाढवला आणि मग एकदम की गोष्ट लक्षात यायला लागली.

केविलवाण्या स्वरात तो
बोलू लागलेला पाहून मी त्याच्या दंडावर थोपटत म्हटलं, सोड... झालं ते झालं. आता
मिटलं. मीच तुझ्यावर सोपवून जायला नको होतं.
दिवसभर कामात ती गोष्ट पुन्हा आठवली नाही, पण संध्याकाळी सर स्वतःहून आमच्या विभागात आले. म्हणाले, मालकाकडून मेल आला होता आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं ज्याने हा फोटो पानावर लावला त्याला आजपासून कामावर कमी करा. कोणाला कमी केलं ते आज रात्री ऑफिस सोडण्यापूर्वी मला कळवा. कळवायला हवं.

पुढे मला म्हणाले,
खरे तर तुलाच कामावरून काढून टाकायला हवा. पण मला वाटतं आपण सालपेकरला कमी करू. मी
निराशेतही उसळून विचारलं, का?
कारण सालपेकरला मी
उद्या दुसऱ्या ठिकाणी नोकरीला शकतो. पगार तेवढाच मिळू शकेल त्याला. पण तुला काढून
टाकलं तर तुझ्यासाठी जॉब नाही माझ्याकडे. मी त्यावर गप्प राहिलो. काय बोलणार...
सालपेकर आणि मला
केबिनमध्ये बोलावलं. त्याला व्यवस्थित सांगितलं. आमच्यासमोरच फोन करून सालपेकरला कामावर घेण्याची विनंती केली. इथल्याएवढा
पगार द्यावा म्हणून प्रयत्नशील होते. पण समोरच्या माणसाने सहकारी नाराज होतील,
महिन्याभरानंतर वाढवतो, असं सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेव मी आणखी चांगला जॉब
शोधून देईन तुला, सर सालपेकरला म्हणाले.
तो थँक्यू म्हणाला. मी दोघांप्रति कृतज्ञ होतो. पण थँक्यू म्हणून मोकळा होऊ इच्छित नव्हतो.
सकाळी लवकर उठलो होतो. दिवसभर काम करून थकलो होतो. म्हणून चहा प्यायला खाली उतरलो.

हे सर्व तिला सांगाव
म्हणून फोन केला तर ती वेडी स्वतः रडत होती. मला नेहमीप्रमाणे माझं गाणं बाजूला
ठेवून तिचं ऐकावं लागलं. काय झालं, हा प्रश्न पाच-सहा वेळा विचारल्यावर म्हणाली, मायाला
परत घेणार होते कामावर. सकाळी मी सरांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. सर तयार
झाले. उद्या बोलु म्हणाले. मी उत्साहाने मायाला कळवलंही. आणि आता पाच मिनिटांपूर्वी
सरांनी मला निरोप पाठवला, मायाला घेऊ शकणार नाही आपण. म्हणून मी रागातच त्यांना
भेटायला गेले तर म्हणाले, वरून आदेश आलाय मला, कोणीतरी सालपेकर नावाचा इसम तिच्या
जागेवर जॉईन होतोय उद्यापासून...
मी सारं समजलो. पण तिला काहीच बोललो नाही. चहा प्यायलो आणि ऑफिसला परतलो.
मनात अपराधाची भावना भरून राहिली.

वैजंयतीच्या फोनमुळे
मी सालपेपरवर काम सोपवलं होतं. त्याची अप्रत्यक्षरीत्या तिला सजा भोगावी लागली. एक
वेगळाच न्याय घडला होता. पण तरीही माझं मन मला खात होतं.
- वैभव बळीराम चाळके
- वैभव बळीराम चाळके
फेब्रुवारी 2013
No comments:
Post a Comment