Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे- जीवनाची क्षणभंगुरता

कवितेतील
 फुलपाखरे

जीवनाची क्षणभंगुरता

तुम्हाला ती गोष्ट माहीत असेलच! एका राजाकडे
एक साधू भिक्षा मागण्यासाठी येतो. राजा गडबडीत
असल्यामुळे तो साधू महाराजांना म्हणतो, महाराज
आज आम्ही कामात आहोत. उद्या या आणि
आपल्याला जे हवे आहे ते घेऊन जा. महाराजांच्या
या विधानावर साधूला हसू फुटते. साधू का हसला?
हा प्रश्न राजाला बेचैन करतो. राजा साधूच्या
मागे जाऊन त्यांना विचारतो, साधू महाराज, मी
तुम्हाला उद्या याच वेळी या हवे ते देतो, असे म्हटले
असतानाही आपण हसलात का?
साधू महाराज नम्रपणे म्हणाले, राजे महाराज,
जेथे जीवनाचे पुढच्या क्षणी काय होणार याचा
भरवसा देता येत नाही, तेथे तुम्ही उद्याची गोष्ट
केलात म्हणून हसू आले.
राजकवी भा.रा. तांबे यांनी ‘जन पळभर
म्हणतिल हाय हाय’ असे सांगून ठेवले आहे.
जीवनाच्या नश्वरतेबद्दल बोलताना त्यांनी थेट
रामकृष्णांचाच दाखला दिला आहे-
 रामकृष्णही आले गेले
त्याविण जग का ओसचि पडले।
राम आणि कृष्णाच्या जाण्याने जगावर काही
परिणाम झाला नाही तर आपण त्यांच्यासमोर
कोण क्षुद्र!
आमच्या गावातील एक भजनी बुवा भजन
म्हणत असे- ‘नाही कुणाचा कुणी तुझा नव्हे रे
कुणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे
म्हणुनी...’
लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर
यांनी एका लेखात पारंपरिक ओवी दिली आहेशेजारीणबाई,
नको म्हणूस माझं माझं
 नदीच्या ग पलीकडे जागा साडेतीन गज
आपल्या बहिणाबाई चौधरींनी सांगितलंय-
आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘मातीवर चढणे
एक नवा थर अंती’ असे म्हटले आहे. जीवनाची
क्षणभंगुरता हा कवींचा नेहमीच औत्सुक्याचाचिंतनाचा
विषय होऊन राहिलेला आहे.
- शब्दवैभव

No comments:

Post a Comment