Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे- सूर्य

कवितेतील
 फुलपाखरे

सूर्य

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ अशी कवीची
महती गायली जाते. म्हणजे कवी हा सूर्यापेक्षा
मोठ्या दृष्टीचा माणूस आहे. त्याचा प्रत्यय
आपल्याला अनेकदा येतो. गणेशाचे वर्णन
करताना ‘सूर्यकोटी समप्रभ’ असे म्हटले आहे.
म्हणजे कोटी सूर्यांइतकी प्रभा आहे असा.
याचा अर्थ महाप्रभेच्या कोटी सूर्यांची प्रभा
एकत्र केली ती केवढा प्रकाश निर्माण होईल
याची कल्पना कवीने केली आहे. रसिक म्हणून
ती आपल्याला करता आली तरच आपण कवीने
निर्माण केलेली प्रतिमा समजून घेऊ शकू.
दुसरी एक गोष्ट ही कल्पना करताना कवीने
केलेली आहे. कवीने उपमा देताना महाप्रभावान,
महातेजस्वी, सूर्यालाच गणेशाच्या प्रभेपेक्षा
कोटीपटींनी छोटा करून दाखवला आहे.
असे अन्यत्र कोठे आढळते का? तर आढळते!
मला याची दोन उदाहरणे माहीत आहेत. एका
काव्यसंमेलनात गझलकार सदानंद डबीर यांनी
महामानव बाबा आमटे यांचा उल्लेख करून
पुढील शेर ऐकविला होताअंधार
सोबतीला घेऊन चाललो मी
लाजून सूर्य आता मागून येत आहे
अर्थातच या शेराला दाद मिळाली. आपल्या
सूर्यमालेतील सर्वात मोठ्या वस्तूला लाज
आणण्याची धमक असणारा बाबा आमटे
नावाचा माणूस आणि तशी कल्पना करणारा
कवी या दोन्ही गोष्टी दाद देण्याजोग्याच आहेत,
नाही का?
अलीकडेच हुल्लड मुरादाबादी यांचा ‘जिगर
से बीडी जला ले’ नावाचा संग्रह घेतला. त्यात
वरील शेराचा सख्खा भाऊ भेटलानामवाले
नाज मत कर देख सूरज की तरफ
ये सवेरे को उगेगा शाम को ढल जाएगा
मला मुरादाबादींना वाह म्हटल्यावाचून
राहवले नाही. कधी तरी एक अभंगिका लिहिली
होती. आता तीही आठवते आहे-
भास्कर तस्कर । करितो तस्करी ।
प्रकाशाची सारी । मालमत्ता॥
         -शब्दवैभव 

No comments:

Post a Comment