मृत्यू वाईट... मग तो कोणाचाही असो, मृत्यू वाईटच. अपघातात झालेल्या मृत्यू वाईट... आजाराने झालेला मृत्यू वाईट.... अकाली झालेला मृत्यू वाईट... तसा वयोमानाने झालेला मृत्यूसुद्धा वाईटच.... मृत्यू म्हणजे अस्तित्वाची समाप्ती. मृत्यू म्हणजे नसणे. मृत्यू म्हणजे शेवट. मृत्यू म्हणजे केवळ अंधार...
थंडीचे दिवस होते. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. त्यामुळे एक तर ऑफिसातल्या सगळ्या सहकार्यांच्या अंगावर नवे कपडे होते. दिवाळीचा उत्साह होता. चेहर्यावर प्रसन्नता होती. अशा वेळी कुसुरकरच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी आली. ऑफिसात एकच शांतता पसरली. बातमी कळल्यावर कुसुरकर ढसाढसा रडला. भावाशी त्याचं नातं जवळचं होतं. तो भावाबद्दल पुन्हापुन्हा बोलत असे. भावाने त्याला लहानाचा मोठा केला होता असेही म्हणे. त्यामुळे भाऊ अचानक गेला हा धक्का त्याला सहन झाला नाही. मृत्यू वाईट... त्यात जवळच्या माणसाचा मृत्यू तर त्याहून वाईट...
कुसुरकर ताबडतोब घरी निघून गेला. त्याला गाडी करून गावाला निघावे लागले. त्याला सोडायला सोबत शिंदे गेला. ऑफिसात दिवसभर लोक त्याच गोष्टीबद्दल बोलत होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि चार वाजता चहाच्या वेळी सुद्धा कुसुरकरच्या भावाच्या मृत्यूची चर्चा ऑफिसात सुरू होती.
पवार म्हणाला, बाराव्याला जायचं का? कुसुरकरचं घर तसं फार लांब नाही आणि रविवार येतोय बाराव्याला... शनिवारी रात्री जाऊन रविवारी कार्य करून रात्री गाडीत बसता येईल. सोमवारी कामावर हजर. कोणीच हो म्हणाले नाही. बघू... विचार करू... असेच सगळ्यांचे म्हणणे होते. पण पवार म्हणाला, मला गेले पाहिजे. माझ्या प्रत्येक गरजेला कुसुरकर भावासारखा उभा राहिला पाठीशी. मी जाणार. तुमच्यापैकी कुणी येणार असेल तर सांगा.
ऑफिसातल्या 18 माणसांपैकी कोणीही जायचं नाव काढलं नाही. दहा दिवस निघून गेले. अकराव्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी निघायचे होते. आज अर्धा दिवसच ऑफिस होते. पण आज पवार आलाच नाही. सगळ्यांना वाटले कदाचित हा सकाळीच गाडीला बसला असेल. पण ऑफिसची वेळ होऊन गेल्यावर उशिराने पवार हजर झाला. म्हणाला, शेजार्याला हार्ट अटॅक आला, त्याला ऍडमिट करून आलोय. आता मला कुसुरकरच्या भावाच्या कार्यालाही जाता येणार नाही. पण मला राहून राहून वाटतंय आपल्यापैकी कोणी तरी गेले पाहिजे. मग तो त्याच्या हाताखाली काम करणार्या ओमकारला म्हणाला, ओंकार एवढं काम करशील, हवे तर तुला जायचायायचा खर्च मी देतो, पण जाऊन ये.
ओमकारच्या शेजारी बसणारी शीतल म्हणाली, खरेतर मलाही जायला हवे. माझ्या मिस्टरांच्या आजारपणात कुसुरकर आठ दिवस रोज येऊन हॉस्पिटलला बसत होता. त्या दिवशीपासूनच मी विचार करते आहे पवारांसोबत जाता आलं तर जावं म्हणून.
मग ऑफिसातल्या इतर सहकार्यांकडे पाहत ती म्हणाली, चला रे कोणी तरी... एकमेकांच्या सोबत असलो म्हणजे कंटाळा येणार नाही. ओमकार निघतोच आहे, शिरोडकर तुम्ही किंवा साठे तुम्ही येताय का, चला जमत असेल तर जाऊन येऊ.
ओमकारचा नाईलाज होता. ओमकार जातो म्हणाला. संध्याकाळपर्यंत हो नाही करता ओंधकरबाई, शीतल आणि ओमकार असे तिघे जण कुसुरकरच्या गावी जायला निघाले. कुसुरकरचं गाव कोल्हापूर-सांगलीच्या दरम्यान कुठेतरी होते. पवारने पत्ता काढून दिला. मुंबई सेंट्रलवरून कोल्हापूरला जाणारी गाडी पकडा आणि कोल्हापूर स्थानकातून पुढे जा असा सल्लाही दिला.
रात्री नऊ वाजताची गाडी होती. तिघेही मुंबई सेंट्रल स्थानकात भेटू असे ठरवून दुपारी आपापल्या घरी गेले.
रात्री नऊची गाडी लागली तेव्हा एकटी शीतलच मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली होती. औंधकरबाईंचा फोन लागत नव्हता. ओमकार आलोच, दोन मिनिटांत आलो, पाच मिनिटांत आलो, असं म्हणत होता. शीतलला काय करावे कळेना. गाडीला काही मिनिटे शिल्लक असताना ओमकार धावतपळत पोहोचला. औंधकरबाई आल्या नाहीत. शेवटी दोघांनी निघायचा निर्णय घेतला आणि गाडी पकडली.
मृत्यू वाईट... ओंकार शीतलला सांगत होता. फक्त माणसाचा नव्हे आमच्या घरी एक कुत्रा होता डॉल्फिन नावाचा. फार लाडात वाढवला होता मी त्याला. त्याचं प्रेम होतं आमच्या सगळ्यांवर. डॉल्फिन गेला तेव्हा तुला सांगतो शीतल, आम्ही तीन दिवस घरी जेवलो नव्हतो, वडापाव खा आणि सँडविच खा असे करत दिवस काढले. माणसाचं सुतक वाईट नसेल इतका वाईट काळ होता तो मला.
शीतल म्हणाली, मी तर असा मृत्यू अनुभवलाय की ती आठवणी नको वाटते पुन्हा.
मृत्यूबद्दलच्या गप्पांनी त्यांच्यात एक निराशा भरून राहिली.
बहिणीच्या मृत्यूची गोष्ट सांगताना शीतल खूपच भावुक झाली. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती हमसून हमसून रडू लागली. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ओमकारला काही क्षण काय करावे कळेना, पण फारच झाले तेव्हा त्याने तिला जवळ घेतले, तिचे डोळे पुसले आणि बराच वेळ तो तिच्या गालावर थोपटत राहिला, शीतलनेही ओमकारच्या कमरेभोवती हात टाकला. तिच्या हाताचा पंजा आपल्या एका कुशीवर रोवलेला ओमकारला स्पष्ट कळला. काहीतरी चुकते असे त्याला वाटायला लागलं. पण काय करावं ते कळत नव्हतं. दोघांमधून वीज संचारून गेली होती.
रात्रीच्या प्रवासात हे असंच होतं. बंध तुटून पडतात. माणसं जवळ येतात. ती एकमेकांना हवीहवीशी वाटतात. शीतल आणि ओमकार यांच्यातील नेमकं तेच झालं. एका मृत्यूची चर्चा करताकरता आणि एका मृत्यूनंतरच्या अंत्यविधीला जाताजाता एक नवाच सर्जनाचा कोंब रुजायला लागला. एक नवंच नातं जन्माला आलं. कुणालाही न कळता वाढलं. रात्रीचा अंधार बहुतेक या अशा अनधिकृत बांधकामांना वेग देत असावा. शीतल तर जवळजवळ त्याच्या मिठीत शिरली होती. ओमकार नको हे सारं म्हणता-म्हणता हवं हे पर्यंतच्या सीमेपर्यंत येऊन पोचला होता. त्यांच्याही नकळत दोघं आता एकमेकांची झाली होती.
पुणे सोडून गाडी सातारच्या दिशेने धावत असताना दोघांनी कुसुरकरच्या गावी जाण्याचा निर्णय रद्दबातल केला. दोघे सातार्याला उतरली. तिथे एसटी स्टँडवर चौकशी करून परिसरातल्या एका चांगल्या हॉटेलात थांबली. आता गाडी बिघडल्याचे कारण सांगून आपण सातार्यातून परत आल्याची बतावणी ते ऑफिसात करणार होते. तसा त्यांनी प्लॅनही केला. रात्री साधारण चार वाजता सातारा स्टँडवर उतरलेली दोघं साडेचारला आपल्या रूमवर पोचली.
साडेनऊ वाजता ओमकारला जाग आली, तेव्हा त्याने घाईघाईने शीतलला उठवले आणि परतीच्या प्रवासाला निघण्याची सूचना केली.
भराभर आंघोळ वगैरे आटोपून दोघे सातारा स्थानकात पोचले. दुपारचे साडे अकरा वाजले होते आणि संध्याकाळपर्यंत दोघे हमखास आपापल्या घरी बसणार होते, पण ऑफिसात कोणालाही शंका नको म्हणून दोघांनी मिळून ओंधकरबाईंना फोन केला. काल रात्री चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत गाडी दुरुस्तीचा निष्फळ प्रयत्न करून झाला आणि मग सातारा डेपोच्या गाडीमधून आम्हाला सातारा डेपोत आणले गेले. तेथून दुसर्या गाडीत बसविण्याची सोय करण्यात आली होती. मात्र इतक्या उशिरा गेल्यावर धर्मविधीला पोचता येणार नाही म्हणून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आणि आता इथे चहा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागतो आहोत, असे त्यांनी औंधकरबाईंना सांगितले.
कोल्हापूरहून आलेली मुंबई गाडी पकडून त्यांनी मुंबई दिशेचा प्रवास सुरू केला.
ऑफिसात आपल्यात झालेल्या देवाणघेवाणीची कोणालाही खबर लागणार नाही याची जणू तरतूद एका फोनमुळे झाली होती.
शीतल परतीच्या प्रवासात ओमकारच्या हातात हात घालत आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू पाहते तेव्हा ओमकार म्हणतो, आता हे पुरे झालं. हे आपल्याला असं नाही चालवता येणार. तुला तुझं घर आहे आणि मला माझं लग्न करायचं आहे. तेव्हा जे झालं ते विसरून जाऊ. त्यातच आपलं हित आहे. शीतलला सुरुवातीला त्याचं हे असं म्हणणं नको वाटलं. पण पूर्ण विचारांती तिनेही ठरवलं की जे झालं ते विसरून जाण्यातच आपलं हित आहे.
आणि मग ओमकार खरंच आपला खरा हितसंबंधी आहे, असं तिला वाटू लागलं. त्याचं म्हणणं तिला पटलं. दोघांनीही जे झालं ते विसरून जाऊ असं ठरवलं. शीतलही त्याचा हात सोडते आणि परक्या माणसाच्या शेजारी बसावे तशी बसते. आपल्यात काही झालंच नाही, आपल्यात आता इथून पुढे काही होणार नाही. आपण ऑफिसात होतो तसेच सहकारी आहोत. गाडी बिघडली त्यात चार तास फुकट गेले, म्हणून आपण परत चाललो आहोत, अशी मनाशी म्हणत शीतल विश्वासदर्शक नजरेनं ओमकारकडे पाहते आणि त्याला मनापासून थँक्स म्हणते.
मृत्यू वाईट... माणसाच्या सभ्यतेचा मृत्यू वाईट... नवर्याच्या आपल्यावरील विश्वासाचा मृत्यू वाईट... बाईच्या नैतिकतेचा मृत्यू वाईट...
... आणि अनैतिक असले तरी नुकत्याच उमललेल्या नात्याचाही मृत्यू वाईट...

- वैभव बळीराम चाळके
9702 723 652
20 एप्रिल 2019
20 एप्रिल 2019
No comments:
Post a Comment